Grammar Check : ‘च’ साठी C वापरायचा की CH? स्पेलिंगच्या या साध्या नियमात 90 टक्के लोक करतात चूक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही कधी विचार केला आहे का, की 'च' या अक्षराचे इंग्रजीसोबत नक्की काय नाते आहे आणि आपण वापरतो ते पर्याय तांत्रिकदृष्ट्या किती बरोबर आहेत? चला तर मग, यामागचं रंजक भाषाशास्त्र समजून घेऊया.
advertisement
advertisement
'च' साठी C की CH? संभ्रम नेमका कुठे आहे?सामान्यतः आपण शाळेत शिकताना 'च' साठी 'CH' (उदा. Chitra, Chamak) आणि 'छ' साठी 'CHH' (उदा. Chhatrapati) असं शिकतो. पण जेव्हा आपण 'Chocolate' (चॉकलेट) हा शब्द पाहतो, तेव्हा तिथे फक्त 'CH' असतो. दुसरीकडे, इटालियन किंवा इतर काही परदेशी भाषांमध्ये फक्त 'C' चा उच्चार 'च' असा केला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मात्र, भारतीय भाषांच्या संदर्भात (मराठी, हिंदी इ.) जेव्हा आपण ISO (International Organization for Standardization) चे नियम पाहतो, तेव्हा संस्कृत किंवा मराठीमधील 'च' साठी फक्त 'C' वापरण्याचा सल्ला दिला जातो आणि 'छ' साठी 'CH' वापरला जातो. पण हा नियम प्रामुख्याने शैक्षणिक किंवा तांत्रिक कामांसाठी मर्यादित आहे.
advertisement
दैनंदिन व्यवहारात काय वापरावे?-CH चा वापर: जर तुम्ही इंग्रजी नियमांनुसार लिहित असाल, तर 'CH' वापरणेच सोयीचे ठरते. यामुळे वाचणाऱ्याला तो 'च' आहे हे लगेच समजते.-नावे लिहिताना: पासपोर्ट किंवा अधिकृत कागदपत्रांवर आपण शतकानुशतके 'च' साठी 'CH' वापरत आलो आहोत (उदा. Chavan, Chander). हाच सराव सर्वांच्या अंगवळणी पडला आहे.
advertisement
advertisement









