TRENDING:

'मेल्यावर माझी कुणी आठवण...', सोलापुरात इन्स्टा स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने संपवलं

Last Updated:

Crime in Solapur: सोलापूर शहरातील सुशील नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: सोलापूर शहरातील सुशील नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका १८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर भावनिक स्टेटस देखील ठेवलं होतं. घरात कुणीही नसताना त्याने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून पुढील तपास केला जात आहे.
News18
News18
advertisement

योगेश अशोक ख्यागे असं आत्महत्या करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्यानं असं अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याने प्रेम प्रकरणातून अशाप्रकारचं पाऊल उचललं असावं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सविस्तर तपास सुरू आहे.

'सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे...'

आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी योगेशने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक हृदयद्रावक स्टोरी अपलोड केली होती, जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने स्टोरीमध्ये म्हटलं होतं की, “मरायच्या आधी सर्वांच्या मनातून उतरून जायचं आहे मला... जेणेकरून मी मेल्यानंतर कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे..!!”

advertisement

आई-वडील बाहेर असताना घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, मयत योगेश एका बेकरी दुकानात काम करत होता. तर त्याचे वडील वॉचमन म्हणून काम करतात. घटनेच्या वेळी योगेशचे आई-वडील नातेवाईकांकडे गेले होते. तो घरात एकटाच होता. योगेशने गळफास घेतल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला तत्काळ खाली उतरवले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या योगेशला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

advertisement

आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलीस तपास सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दागिने नाही तर... पुणेकर या लाख मोलाच्या वस्तू मोफत पाहता येणार, कधी आणि कुठं?
सर्व पहा

योगेश ख्यागे याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचललं, याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. प्रेमसंबंध, कामाचा ताण, किंवा अन्य कोणत्याही कौटुंबिक कारणामुळे त्याने असं टोकाचं पाऊल उचललं असावे, अशा चर्चा परिसरात सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मेल्यावर माझी कुणी आठवण...', सोलापुरात इन्स्टा स्टोरी ठेवत 18 वर्षीय तरुणाने संपवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल