माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील घराण्याचे मोठे प्राबल्य आहे. मोहिते पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आपल्याच घरातील उमेदवारांना रिंगणात उतरून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली आहे. दुसरीकडे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी पत्नीला जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला उतरवले आहे.
कोण कुठून रिंगणात?
फोंडशिरस जिल्हा परिषद : अर्जुनसिंह मोहिते पाटील (खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू)
advertisement
यशवंतनगर पंचायत समिती : वैष्णवीदेवी मोहिते पाटील (अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची पत्नी)
दहिवडी जिल्हा परिषद गट : जीवन उत्तम जानकर (राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र)
दहिवडी जिल्हा परिषद गट : संस्कृती राम सातपुते (भाजप माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी)
मानेगाव जिल्हा परिषद गट : माढा तालुक्यातील मातब्बर नेते शिवाजीराव सावंत यांनी आपले सुपुत्र पृथ्वीराज यांना मानेगाव या जिल्हा परिषद गटातून मैदानात उतरवले आहे
पांडे जिल्हा परिषद गट : रश्मी दिगंबर बागल , करमाळा तालुक्यातून भाजप नेत्या रश्मी बागल यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून रश्मी बागल यांनी निवडणूक लढवली होती.
अक्कलकोट तालुक्यात सत्ताधारी आमदार आणि माजी मंत्र्यांच्या कुटुंबीयांची लक्षणीय उपस्थिती दिसते. अक्कलकोट तालुक्यात शिवसेना आणि भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमने सामने आहे.
चपळगाव जिल्हा परिषद : शांभवी सचिन कल्याणशेट्टी (आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी)
चपळगाव जिल्हा परिषद : पूजा सागर कल्याणशेट्टी (आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वहिनी)
चपळगाव पंचायत गण : सागर कल्याणशेट्टी (आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू)
तोळनूर पंचायत गण : शीतल सिद्धाराम म्हेत्रे (माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कन्या)
सलगर जिल्हा परिषद गट : शिवराज सिद्धाराम म्हेत्रे (माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा मुलगा)
उत्तर सोलापूर येथेही माजी आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवारी घेतल्याचे चित्र आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती गण आहे. भाजप पक्षाकडून माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील यांचे बंधू मैदानात आहेत.
कोंडी जिल्हा परिषद गट : डॉ. पृथ्वीराज दिलीप माने (माजी आमदार दिलीप माने यांचे पुत्र)
बीबी दारफळ जिल्हा परिषद गट : इंद्रजित पवार (भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू)
दक्षिण सोलापूर तालुक्यात माजी आमदार प्रतिक पाटील यांच्या पत्नीला शिवसेना पक्षाकडून जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्यात आली आहे.
हत्तूर जिल्हा परिषद गट : लक्ष्मी रतिकांत पाटील (माजी आमदार रतिकांत पाटील यांच्या पत्नी)
मोहोळ तालुक्यात पक्ष नेतृत्व थेट मैदानात उतरले असून, कुटुंबीयांनाही संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून उमेश पाटील यांनी कुरुल जिल्हा परिषद तर शिवसेनेकडून त्यांचे भाऊ संतोष पाटील यांनी नरखेड जिल्हा परिषदेतून तिकीट मिळवले आहे.
कुरुल जिल्हा परिषद गट : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील स्वतः उमेदवार
नरखेड जिल्हा परिषद गट : संतोष पाटील (राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे बंधू)
त्यामुळे स्थानिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घरातल्याच नातेवाईकांना उमेदवारी देण्याचे प्रकार समोर आले आहेत.
