आकाश पुजारी हा मंद्रूप येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी मध्ये शिकत होता. तो आपल्या आई वडिलांना सतत मोबाईल घेऊन द्या, अशी मागणी करत होता. मात्र, आई वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी मोबाईल घेऊन दिला नव्हता. मोबाईल घेण्यावरून तो घरात आई-वडिलांशी वाद घालत होता. आई वडील एक स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही अशा विचाराने आकाश हा निराश झाला होता.
advertisement
वाचा - 13 वर्षांचं प्रेम अन् विजयचा झाला गेम, कोयत्या गँगनं नव्हे सुजाताने पुणे हादरवलं
गळफास घेत संपवले जीवन
मोबाइलवरून तो घरात सातत्याने आई-वडिलांशी वाद घालायचा. शनिवारी रात्री उशिराने तो घरी आला. आई-वडील झोपल्यानंतर त्याने घरापासून जवळच असलेल्या आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. रविवारी पहाटेपासून आई-वडिलांनी आकाशचा शोध घेतला असता तो शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती मंद्रुप पोलिसांना दिली. मंद्रुप पोलीस घटनास्थळावर दाखल झाल्यानंतर आकाशचा मृतदेह खाली उतरविला. त्यानंतर मृतदेह मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. या घटनेची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात झाली आहे.