सोलापूर : शाळेत नापास झाल्यावर अनेक जण खचतात. मात्र, काही जण असे असतात जे नापास झाल्यावरही खचत नाही आणि आपल्यात जी कला आहे, ती कला जोपासत आपली स्वप्ने पूर्ण करतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. सचिन खरात असे या सोलापूरच्या मातीत जन्मलेला मनस्वी कलावंताचे नाव आहे.
advertisement
विपरीत परिस्थितीत त्याचे शिक्षण थांबले. संगत बिघडली. वाईट वळण पटकन लागले आणि शब्दशहा वाया गेलेला हा तरुण एके दिवशी चांगल्या वाटेवर आला, अशी विचार करायला लावणारी त्याची कहाणी आहे.
मुंबईच्या जे. जे. महाविद्यालयातून त्याने पदवी घेतली आणि चित्रकलेच्या प्रांतात स्वतःचे नाव प्रस्थापित केले. आज स्वतःबरोबरच स्वतःच्या कुटुंबाला नवी दिशा दाखवली. त्याने भावाला आणि बहिणीला शिकवले. कष्टकरी आईला चांगले दिवस दाखवले. जगाच्या कानाकोपऱ्यात स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला, असा या सचिनचा प्रवास आहे. आज लोकल18 च्या टीमने चित्रकार सचिन खरात यांचा कार्याचा घेतलेला हा विशेष आढावा.
सचिनने चित्रांत प्रामुख्याने प्राचीन भारतीय समाजातील स्त्री चितारली आहे. 16 शृंगार हा विषय निवडला आहे. स्त्री सौंदर्याचे अनेक आयाम दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. चित्रातल्या स्त्रीच्या शरीरावरही पुसट छटेत चित्रे रंगवली आहेत. त्यासाठी त्याने खूपच कष्ट घेतल्याचे दिसते. अलंकार खास रंगवले आहेत. चित्राशयाचा प्राचीन काळ ठासवण्यासाठी त्या काळीतील नाणी त्याने खुबीने चितारली आहेत. अॅक्रेलिक रंगमाध्यमातील त्याची चित्रे रंग आणि प्रतिमेच्या बाबतीत अजंठाच्या प्राचीन चित्रांची आठवण करून देतात.
चित्रकार म्हणून व्यावसायिक आयुष्य उभं करणं, ही फार खर्चिक आणि जोखमीची गोष्ट आहे. कारण, आधी चित्रकलेची पदवी घ्यावी लागते. मग, स्वतःला सिद्ध करावं लागतं. त्यासाठी नामांकित आर्ट गॅलरीत प्रदर्शनाचे आयोजन करावे लागते. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवायचे तर दिवसाचे भाडे 10 हजार रुपये आकारले जाते. लाईटचा खर्च वेगळा.
पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेत असाल तर आताच थांबा, अन्यथा होतील हे गंभीर परिणाम
तारीख निश्चित करण्यासाठी पाच वर्षे प्रतीक्षा यादीत राहावे लागते. त्यातही चार वर्षांनी संबंधित चित्रकाराला आपली चित्रे सीडीच्या माध्यमातून गॅलरीत पाठवावी लागतात. ती पसंत पडली तरच प्रदर्शनात ती मांडता येतात, असा हा व्याप आहे. मात्र, चित्रकार सचिन खरात यांनी ही सारी आव्हाने पार करून स्वतःचा ब्रॅण्ड निर्माण केला आहे. त्यांचा प्रवास हा निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.