पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेत असाल तर आताच थांबा, अन्यथा होतील हे गंभीर परिणाम
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पाळी येणे एक नैसर्गिक चक्र आहे. त्यामध्ये आपण ढवळाढवळ करणे हे अत्यंत चुकीचे आहे. या गोळ्या घेतल्याने जी नैसर्गिक पद्धतीने पाळी येते, ती पाळी येण्याचे चक्र बिघडून जाते.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. महिन्यातून एक वेळा ही प्रत्येक महिलेला येत असते. मात्र, महिला या कोणत्याही कारणामुळे किंवा धार्मिक कामासाठी पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेतात. मात्र, याचे अनेक वाईट परिणाम हे आपल्या शरीरावर होतात. त्यामुळे यामुळे शरीरावर नेमके काय दुष्परिणाम होतात, याबाबत स्त्रीरोग तज्ञ डॉ. रश्मी बोरीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पाळी येणे एक नैसर्गिक चक्र आहे. त्यामध्ये आपण ढवळाढवळ करणे हे अत्यंत चुकीचे आहे. या गोळ्या घेतल्याने जी नैसर्गिक पद्धतीने पाळी येते, ती पाळी येण्याचे चक्र बिघडून जाते. म्हणजेच की, जे नैसर्गिक बीज तयार होत असतात ते या गोळीमुळे तयार होत नाही आणि यामुळे पाळीमध्ये अनियमितता येऊ शकते. त्यामुळे असे करणे चुकीचे आहे. वारंवार या गोळ्या घेतल्याने रिप्रोडक्शन सिस्टीमवर परिणाम होतात. पण त्यासोबतच संपूर्ण शरीरावरही याचे परिणाम होतात.
advertisement
त्यासोबतच पाळीमध्ये अनियमित्ता येते म्हणजे कधी तारखेच्या अगोदर पाळी येते, तर कधी तारीख होऊन गेली तरी पण लवकर पाळी येत नाही. तसेच हार्मोनवर याचा मोठा परिणाम होतो. पाळीमध्ये अति रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. किंवा गोळ्या घेतल्याने रक्तस्त्रावही होत नाही, असेही काही जणांना वाटते. त्यासोबतच ज्या अविवाहित महिला आहेत किंवा ज्यांचे नुकतंच लग्न झाले आहे, अशा महिलांनी जर वारंवार या गोळ्या घेतल्या असतील तर त्यांना मातृत्व होण्यावरती परिणाम होतो.
advertisement
सोलापूर बाजार समितीत 192 ट्रक कांदा आवक, जुना कांदा खातोय भाव, इतका आहे दर
view commentsअनेक असे बदल महिलांच्या शरीरामध्ये होतात. त्यामुळे तुम्ही पाळी अगोदर येण्याच्या किंवा पाळी नंतर येण्याच्या गोळ्या किंवा इंजेक्शन घेत असाल तर ते घेणे टाळावे. जे नैसर्गिक पद्धतीने चालले आहे, त्याचप्रमाणे चालू द्यावे नाहीतर त्याचे असे परिणाम हे तुमच्या शरीरावरती होतात, असेही डॉ. रश्मी बोरीकर यांनी सांगितले.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 24, 2024 4:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पाळी लांबविण्याच्या गोळ्या घेत असाल तर आताच थांबा, अन्यथा होतील हे गंभीर परिणाम

