TRENDING:

पुणे-मुंबई नव्हे, महाराष्ट्रातल्या या शहरात होतंय नवं IT पार्क, CM फडणवीस यांचा शब्द आणि मोठं अपडेट

Last Updated:

Solapur IT Park: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला आयटी पार्क देण्याचा शब्द दिला होता. आता याबाबत महत्त्वाचं अपडेट पुढं आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: महाराष्ट्रात हिंजवडीनंतर सर्वात मोठा आयटी पार्क तयार होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पाहिलेलं सोलापूरकरांचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. त्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. होटगी येथील गट नंबर 576 मधील 20 हेक्टर (50 एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला (MIDC) हस्तांतरित करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली असून, यामुळे सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.
Solapur IT Park: पुणे-मुंबई नव्हे, महाराष्ट्रातल्या या शहरात होतंय नवं IT पार्क, 50 एकर जमिनीबाबत महत्त्वाचं अपडेट
Solapur IT Park: पुणे-मुंबई नव्हे, महाराष्ट्रातल्या या शहरात होतंय नवं IT पार्क, 50 एकर जमिनीबाबत महत्त्वाचं अपडेट
advertisement

पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरला आयटी पार्क देण्याचा शब्द दिला होता. या जमीन हस्तांतरणाच्या निर्णयामुळे तो शब्द पूर्ण होण्याच्या दिशेने प्रशासन गतिमान झाले आहे. आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे मोठे यश मिळाले असून, विकसित सोलापूरची ही खऱ्या अर्थाने पायाभरणी ठरेल.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 32 तास अडकलेल्या त्या 1 लाख प्रवाशांना दिलासा; सरकार देणार 5.2 कोटी, कधी होणार खात्यात जमा?

advertisement

या प्रकल्पामुळे सोलापूरमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळणार असून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक तरुणांना शहरातच रोजगार मिळावा, यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

सोलापूरच्या वस्त्रोद्योग व्यवसायाला इचलकरंजीच्या धर्तीवर सवलती देण्याबाबत आगामी अधिवेशनात बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शहरातील विमानसेवा आणि समांतर जलवाहिनीची कामे पूर्ण झाली असून अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामेही लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व निर्णयांमुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
पुणे-मुंबई नव्हे, महाराष्ट्रातल्या या शहरात होतंय नवं IT पार्क, CM फडणवीस यांचा शब्द आणि मोठं अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल