advertisement

दहावीचा पहिला पेपर, वडिलांचं झालं निधन; अश्रू आवरत धनश्री पोहोचली परिक्षेला, शिक्षकही रडले!

Last Updated:

दहावीचा पहिला मराठीचा पेपर… वर्षभराची मेहनत आणि मोठी स्वप्ने. मात्र पेपरला जाण्याच्या काही तास आधीच तिचे वडील भिकाजी पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

वडिलांच्या स्वप्नासाठी अश्रूंवर मात; अंत्यविधीपूर्वी दहावीचा पेपर देणारी सोलापूर
वडिलांच्या स्वप्नासाठी अश्रूंवर मात; अंत्यविधीपूर्वी दहावीचा पेपर देणारी सोलापूर
सोलापूर : सोलापूर शहरात एका दहावीच्या विद्यार्थिनीने दुःखाच्या डोंगराखालीही धैर्याचा दीप पेटवला. सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये शिकणारी धनश्री भिकाजी पवार हिच्यासाठी शुक्रवारची सकाळ आयुष्य बदलणारी ठरली. दहावीचा पहिला मराठीचा पेपर… वर्षभराची मेहनत आणि मोठी स्वप्ने. मात्र पेपरला जाण्याच्या काही तास आधीच तिचे वडील भिकाजी पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
घरात शोककळा पसरली होती. नातेवाईक जमा होत होते. वडिलांच्या जाण्याने धनश्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. अशा वेळी पेपर देणे शक्य आहे का, हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. पण शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण घातले. ते स्वतः धनश्रीच्या घरी गेले. त्यांनी कुटुंबीयांना समजावले की, आज जर तिने पेपर दिला नाही, तर वडिलांचे स्वप्न अपुरे राहील. शिक्षकांच्या शब्दांवर विश्वास ठेवत कुटुंबाने अंत्यविधी दोन तास पुढे ढकलण्याचा कठोर निर्णय घेतला.
advertisement
डोळ्यांत अश्रू, मनात वेदना आणि हृदयात वडिलांची आठवण घेऊन धनश्री परीक्षा केंद्रावर पोहोचली. तिची अवस्था पाहून शिक्षणाधिकारी सचिन जगताप स्वतः केंद्रावर आले आणि तिला आधार दिला. विशेष परवानगीने तिने दीड तासात पेपर पूर्ण केला. पेपर संपताच शाळेचे सेवक संतोष लोंढे यांनी तिला घरी पोहोचवले. एका बाजूला पितृछत्र हरपल्याचे दुःख, तर दुसऱ्या बाजूला भविष्याची जबाबदारी… या कठीण प्रसंगात धनश्रीने दाखवलेले धैर्य सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणणारे ठरले.
view comments
मराठी बातम्या/सोलापूर/
दहावीचा पहिला पेपर, वडिलांचं झालं निधन; अश्रू आवरत धनश्री पोहोचली परिक्षेला, शिक्षकही रडले!
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement