EV vs Petrol: नवी कार खरेदीपूर्वी जाणून घ्या 5 वर्षांच्या रनिंग कॉस्टचं गणित
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
पेट्रोलच्या वाढत्या किंमतींदरम्यान ईव्ही खुप स्वस्त पडते का? आम्ही Tata Nexon पेट्रोल आणि Tata Nexon EV चा 5 वर्षांचा पूर्ण रनिंग कॉस्ट कॅलक्युलेशन केलं. जाणून घ्या इंधन, चार्जिंग, मेंटेनेंस आणि इन्शुरन्स मिळून कुठे जास्त बचत होते आणि तुमच्यासाठी कोणती कार खरेदी करणं योग्य ठरेल.
मुंबई : नवीन कार खरेदी करणे जीवनातील महत्त्वाचा निर्णय असतो. मात्र आजकाल हा निर्णय फक्त डिझाइन किंवा फीचर्सवर टिकत नाही. वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमतींमनी लोकांना दुसऱ्या ऑप्शनकडे वळण्यास मजबूर केलंय. अशावेळी ईव्ही खुप बेस्ट ऑप्शन म्हणून समोर येत आहे.
तुम्ही येणाऱ्या काळात एक कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल आणि कंफ्यूज आहात की, पेट्रोल की ईव्ही कारमधून कोणती निवडावी. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आम्ही उदारण म्हणून Nexon ICE आणि Nexon EV घेतली आहे.
सध्या, पेट्रोलची सरासरी किंमत प्रति लिटर ₹94.50 ते ₹95.50पर्यंत पोहोचली आहे, तर घरी ईव्ही चार्ज करण्याचा खर्च फक्त ₹1 प्रति किमी आहे. दरवर्षी 15,000 किमी चालवणाऱ्या सरासरी भारतीय खरेदीदारासाठी, 5 वर्षांचा रनिंग खर्च गेम-चेंजर ठरू शकतो. सरकारच्या ईव्ही धोरणामुळे, FAME-II चा विस्तार आणि बॅटरीच्या घसरत्या किमतींमुळे ईव्ही लोकप्रिय होत आहेत, पण त्या खरोखर परवडणाऱ्या आहेत का? की पेट्रोल कार तितक्याच विश्वासार्ह ठरतील? आज आपण दोघांमधील फरक शोधू.
advertisement
Nexon ICE आणि Nexon EV वरुन गणित समजून घेऊया
यामध्ये उदाहरण पाहायचं झाल्यास Nexon ICE आणि Nexon EV ला घेतलं आहे. यामध्ये टाटा नेक्सॉन पेट्रोल आणि नेक्सॉन EV (एम्पावर्ड प्लस) चा समावेश आहे. पेट्रोलच्या नेक्सॉनची ऑन-रोड किंमत जवळपास 13-14 लाख रुपये तर Nexon EV ची किंमत 17-18.5 लाख रुपयांपर्यंत जाईल. म्हणजेच सुरुवातीला ईव्हीमध्ये 4-5 लाख एक्स्ट्रा खर्च होतील. मात्र खरी कहानी येथूनच सुरु होते. चला दोन्हीमध्ये फायदे-तोटे समजुन घेऊया.
advertisement
फ्यूल/चार्जिंग खर्च
तुम्ही दरवर्षी 15,000 किमी गाडी चालवली तर 5 वर्षांमध्ये एकूण मायलेज 75,000 किमी होईल. पेट्रोल नेक्सॉनसाठी 15 किमी/लीटर (शहर-महामार्ग मिश्रण) वास्तविक जगात सरासरी मायलेज गृहीत धरल्यास, एकूण पेट्रोल वापर 5,000 लिटर होईल. ₹95/लीटर दराने, तुम्हाला 5 वर्षांमध्ये इंधनावर 4,75,000 रुपये खर्च येतील.
दुसरीकडे, Nexon EV चा रियल-वर्ल्ड एफिशिएंसी 7 किमी/यूनिट (घरावर एसी चार्जिंग) आहे. अशाप्रकारे 5 वर्षात 75 हजार किलोमीटर चालल्यावर एकूण 10,714 यूनिट खर्च करेल. सरासरी घरगुती वीज दर ₹6-8/युनिट असेल. राउंड फीगर आपण ₹7/युनिट मानून घेऊया. अशा प्रकारे, 5 वर्षांचा एकूण खर्च सुमारे 75 हजार रुपये असेल. दोघांची तुलना केल्यास, 5 वर्षांमध्ये अंदाजे 3-3.30 लाख रुपये बचत होईल.
advertisement
मेंटेनेंस कॉस्ट
पेट्रोल कारमध्ये इंजिन ऑइल, फिल्टर, टायमिंग बेल्ट, स्पार्क प्लग आणि क्लच सारखे पार्ट्स बदलावे लागतात. याव्यतिरिक्त प्रत्येक 10,000 किमीवर सर्व्हिसही करुन घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे 5 वर्षात एकूण मेंटेंनेंस ₹60,000-75,000 दरम्यान असु शकेल.
दरम्यान, EVमध्ये इंजिन नाही. ब्रेक पॅड, टायर आणि सॉफ्टवेअर अपडेट्ससाठी तुम्हाला फक्त किरकोळ खर्च करावा लागेल. बॅटरी वॉरंटी 8 वर्षे/1.6 लाख किमी आहे. एकूण देखभाल खर्च फक्त ₹15,000-25,000 आहे. यामुळे देखभाल आणि सेवेवर 40-50 हजार रुपयांची बचत होते.
advertisement
विमा आणि टॅक्स
EV ची जास्त एक्स-शोरुम प्राइजमुळे वार्षिक इन्शुरेन्स ₹10-15% महाग (पहिले वर्ष ₹80,000 vs पेट्रोल ₹50,000) आहे. 5 वर्षात ईव्हीचा एकूण इन्शुरन्स ₹3-3.5 लाख, पेट्रोलचं ₹2.5-2.8 लाख असेल. खरंतर अनेक स्टेंट्समध्ये ईव्हीला रोड टॅक्समध्ये 50-100% सूट मिळत आहे. यूपीमध्येही ईव्हीवर टरजिस्ट्रेशन चार्ज कमी आहे. एकूणच हे अंतर ₹50,000-70,000 चं राहतं.
advertisement
एकूण 5 वर्षांची ओनरशिप कॉस्ट (75,000 किमी)
पेट्रोल नेक्सॉन : खरेदी ₹13.5 लाख +ईंधन ₹4.75 लाख + मेंटेनेंस ₹65,000 + इन्शुरन्स ₹2.7 लाख. अशा प्रकारे जवळपास 22 लाख रुपयांपर्यंत आकडा पोहोचतो.
नेक्सनॉ EV: खरेदी ₹18 लाख + चार्जिंग ₹75,000 + मेंटेनेंस ₹20,000 + इन्शुरेन्स ₹3.2 लाख. याचा एकूण आकडाही जवळपास 22 लाख रुपयांच्या आजसपास पोहोचतो.
advertisement
दोन्ही नंबर जवळपास समान दिसतात. मात्र 15,000 किमी/साल हून जास्त चालवणाऱ्यांसाठी EV 3-4 वर्षात ब्रेक-ईव्हन करते. 20,000 किमी/वर्षावर ईव्ही 5 वर्षात ₹2-2.5 लाख स्वस्त पडते. तुम्ही टॅक्स/कॅब चालवली तर बचत आणखी जास्त होईल.
रीसेल व्हॅल्यू आणि इतर फॅक्टर
पेट्रोल कारची रीसेल चांगली मानली जाते. मात्र ईव्हीची बॅटरी टेक्नॉलॉजी परफेक्ट होतेय. 2026 मध्ये नेक्सॉन ईव्हीची 3 वर्षांनंतर रीसेल 55-60% राहण्याची आशा आहे आणि पेट्रोललाही 60-65% च्या आसपास रीसेल व्हॅल्यू मिळू शकते.
कोणती खरेदी करणे समजदारी?
तुम्ही रोज 40-50 किमीहून कमी चालवत असाल आणि बजेट टाइट असेल तर पेट्रोल काह अजुनही सेफ आहे. 12,000+ किमी/वर्ष घरात चार्जिंग सुविधा आणि 5+ वर्षे ठेवण्याचा प्लॅन असेल तर ईव्ही ही स्मार्ट चॉइस ठरेल. ईव्ही खरेदी करुन तुम्ही 5 वर्षात 10 टन CO2 ची बचत करु शकाल. वेळोबरोबर चार्जिंग इंफ्राही चांगला होईल. ज्यामुळे ईव्ही चालवणं आणखी चांगलं होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 7:16 PM IST







