Maharashtra Cabinet : शेअर बाजारात सरकारी कंपनी लिस्टेड होणार, सरकारी नोकऱ्यांत 'IT कॅडर' येणार! राज्य मंत्रिमंडळाचे ५ धडाकेबाज निर्णय
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकीत कॅबिनेटने पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार, राज्यात आता 'इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता' हा स्वतंत्र मंत्रालयीन विभाग स्थापन होणार आहे.
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकीत कॅबिनेटने पाच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार, राज्यात आता 'इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता' हा स्वतंत्र मंत्रालयीन विभाग स्थापन होणार आहे. तर महावितरणची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने 'धाडसी' पाऊल उचलण्याच्या निर्णयावर कॅबिनेटनं शिक्कामोर्तब केले आहे. प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी दोन महत्त्वाच्या कंपन्या स्थापन केल्या जाणार आहेत. याशिवाय, कोल्हापूर, सांगली यांसारख्या पूरग्रस्त भागांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.
>> राज्य मंत्रिमंडळ बैठकीतले पाच महत्त्वाचे निर्णय...
> महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभाग स्थापन करण्यात येणार आहे. विकसित भारत २०४७ मधील विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाच्या पुर्तीसाठी महत्वाचे पाऊल. माहिती तंत्रज्ञान संचालनायाचे रुपांतर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता आयुक्तालयात होणार. मंत्रालयीन विभाग, आयुक्त कार्यालय व सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरुपी पदांचा समावेश असलेले नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग (IT Cadre) निर्माण होणार. राज्यातील माहिती तंत्रज्ञान, एआय, डिजीटल गव्हर्नन्सला गती लाभणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
> महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (MRSAC) आता कंपनी होणार आहे. सोसायटी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणी रद्द करुन कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम ८ अंतर्गत कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार – पाणलोट विकास, डोंगरी विकास योजना, ई- पंचनामा, महा अग्री टेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन, खनिच व खाणींचा अभ्यासाला गतीमानता लाभणार आहे.
advertisement
> भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा (Geospatial Technology) वापर करुन प्रशासनात गतिमानता आणण्याकरिता महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, भूस्थानिक नवोप्रक्रम व उद्योजकता विभागामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, संशोधकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविता येणार.
> महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन हमी असलेल्या ३२,६७९ कोटींच्या कर्जासाठी भांडवली बाजारात सरकारी रोखे आणण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचे विभाजन (Agri Demerger) करण्यात येणार. तसेच महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यात येणार आहे.
advertisement
> महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यास मंजुरी. आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारणार. यात जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा निधी मिळणार. आपत्तीचा फटका बसलेल्या नागरीकांना गृह कर्जात तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना कर्जासाठी सवलत तसेच विमा सुरक्षा उपलब्ध होणार. पुराच्या पाण्याचा निचऱ्यासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांसह, कृष्णा खोऱ्यातील पूराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार कऱण्यात येणार.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 2:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Cabinet : शेअर बाजारात सरकारी कंपनी लिस्टेड होणार, सरकारी नोकऱ्यांत 'IT कॅडर' येणार! राज्य मंत्रिमंडळाचे ५ धडाकेबाज निर्णय









