advertisement

कर्जबाजारी राजपाल यादवची चार चौघात उडवली खिल्ली, सपोर्टसाठी उतरला सलमान खान; म्हणाला, 'डॉलर कितीही असो...'

Last Updated:

Salman Khan Supports Rajpal Yadav : एका अवॉर्ड शोमधला राजपाल यादवचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या अवॉर्ड शोमध्ये राजपाल यादवची खिल्ली उडवण्यात आली.

News18
News18
अभिनेता राजपाल यादव काही दिवसांआधी एका मोठ्या वादात अडकला होता. 9 कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात त्याला तिहाड जेलमध्ये जावं लागलं होतं. या प्रकरणामुळे त्याच्या करिअरवरही परिणाम झाला. त्या कठीण काळात इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याच्यापासून अंतर ठेवलं होतं.  मात्र अशा वेळी सलमान खान त्याच्या पाठीशी उभा राहिला होता. रिपोर्टनुसार, सलमानने त्याला आर्थिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारे त्याची मदत केली होती. त्यामुळेच राजपाल यादवला या संकटातून बाहेर पडण्यासाठी मोठी मदत झाली.
दरम्यान एका अवॉर्ड शोमधला राजपाल यादवचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या अवॉर्ड शोमध्ये राजपाल यादवची खिल्ली उडवण्यात आली. त्याच्या कर्जबाजारी असण्यावरून जोक करण्यात आले.  त्यानंतर आता राजपाल यादवला थेट सलमान खाननं सपोर्ट दिला आहे. राजपाल यादवच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर करत सलमान खानने सगळ्यांना उत्तर दिलं आहे.
advertisement
सलमान खानने राजपाल यादवचा त्या अवॉर्ड शोमधील फोटो शेअर केला आहे. सलमानने पोस्टमध्ये लिहिलंय, "राजपाल भैया, तुम्ही 30 वर्षांपासून काम करत आहात आणि आम्ही सगळ्यांनी तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहिलं आहे. कारण तुम्हाला तुमचं काम चांगलं माहिती आहे आणि तुम्ही त्यात एक वेगळीच व्हॅल्यू आणता. तुम्हाला पुढे काम मिळतीलच आणि याच डॉलर रेटवर मिळतील आणि मिळत राहतील हीच खरी वस्तुस्थिती आहे."
advertisement
advertisement
सलमान खान पुढे म्हणाला, "आणि हे लक्षात ठेवा की कधी कधी फ्लोमध्ये काही गोष्टी बोलल्या जातात. द्यायचंच असेल तर ते मनात ठेवा आणि मनापासून काम करा. डॉलर वर गेला किंवा खाली आला त्याने काय फरक पडतो? शेवटी द्यायचं तर भारतातच आहे."
अवॉर्ड शोमध्ये नेमकं काय झालं?
अवॉर्ड शोमधील राजपाल यादवचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात तो म्हणतोय, "मी विचार करत होतो की सध्या जगभरात खूप धुराचं वातावरण आहे. इतकी युद्धे सुरू आहेत. कुठे बसू, काय विचार करू? रुपये-डॉलर सगळं वर-खाली होत आहेत. काहीच समजत नाहीये. फक्त बसून शांती-शांती असंच म्हणतोय."
advertisement
यानंतर सौरभ द्विवेदीनं म्हटलं, "राजपाल भाई डॉलर-रुपया कितीही वर-खाली झाला तरी तुम्हाला जितके पैसे उधार आहेत तितकेच परत करावे लागतील." या वक्तव्यावर राजपाल हसू लागला आणि म्हणाला, "अहो समस्या काय आहे ( मसला क्या है) ते तरी एकदा ऐका." त्यानंतर जाकिर खानही म्हणाला, "माझ्या मते हे प्रकरण न्यायालयात आहे त्यामुळे ही गोष्ट इथेच सोडूया."
advertisement
यानंतर फरहानने विचारलं की, "तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही प्रियदर्शनसोबत जवळपास 100 चित्रपट केले असतील?" यावर राजपाल यादवने सांगितलं की, मी राम गोपाल वर्मा, प्रियदर्शन आणि डेविड धवन यांच्यासोबत हाफ सेंच्युरी केली आहे. त्यानंतर फराहने म्हटलं की, सलमान खानचं तुझ्याशिवाय चालत नाही. यावर राजपाल यांनी सहमती दर्शवत अक्षय कुमार आणि सलमान खान यांची नावं घेतली. शाहरुख खानसोबतही त्यांनी 3-4 फिल्म केल्या आहेत असं त्याने सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
कर्जबाजारी राजपाल यादवची चार चौघात उडवली खिल्ली, सपोर्टसाठी उतरला सलमान खान; म्हणाला, 'डॉलर कितीही असो...'
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement