advertisement

द्राक्षांवर वाढला केवडा-भुरीचा प्रादुर्भाव? वेळीच करा रोग व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

या बदलांचा परिणाम द्राक्षांच्या वाढीवर झाला असून सध्या बागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः केवडा आणि भुरी हे रोग मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.

+
पावसामुळे

पावसामुळे द्राक्षांवर केवडा-भुरीचा प्रादुर्भाव वाढला; तज्ज्ञांकडून तातडीच्या फवा

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये द्राक्षाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने आणि थंडीचा कालावधी लांबल्याने वातावरणात मोठे बदल झाले. या बदलांचा परिणाम द्राक्षांच्या वाढीवर झाला असून सध्या बागांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः केवडा आणि भुरी हे रोग मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. याबद्दलचं सोलापूर कृषी विज्ञान केंद्रचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबाडे यांनी माहिती दिली आहे
लालासाहेब तांबाडे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले की, सतत ढगाळ वातावरण आणि आर्द्रता वाढल्यामुळे केवडा रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. या रोगामुळे पानांवर पिवळसर डाग दिसतात आणि पुढे संपूर्ण पान करपण्याची शक्यता असते. या रोगाच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब या मिश्रणाची 15 ग्रॅम मात्रा 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर फवारणी केल्यास रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
advertisement
तसेच भुरी रोगाचाही प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. भुरीमुळे पानांवर आणि घडांवर पांढऱ्या चूर्णासारखा थर दिसतो, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी टेट्राकोनॅझोल 10% ईसी 5 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा हेक्झाकोनॅझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
द्राक्ष बागायतदारांनी हवामानातील बदल लक्षात घेऊन नियमित पाहणी करावी आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणीचे नियोजन करावे. योग्य व्यवस्थापन केल्यास केवडा आणि भुरी या दोन्ही रोगांवर नियंत्रण मिळवून द्राक्षातून भरघोस उत्पन्न घेणे शक्य आहे, असा विश्वास तांबाडे यांनी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
द्राक्षांवर वाढला केवडा-भुरीचा प्रादुर्भाव? वेळीच करा रोग व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
Next Article
advertisement
Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं
  • पाकिस्तानच्या शाहिन आफ्रीदीच्या व्हिडिओची चर्चा

  • सचिन तेंडुलकर विराटशी ठेवलं खास कनेक्शन

  • आफ्रीदीच्या त्या कृतीने भारतीय फॅन्स खुश

View All
advertisement