Success Story : कारले शेती गोड प्रयोग, वर्षाला 15 लाखांचं उत्पन्न, शेतकऱ्याची भन्नाट आयडिया!
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
शेतकरी आप्पासाहेब आहेर हे गेल्या 5 वर्षांपासून कारल्याची शेती करत आहेत. पहिल्या वेळेस तीन एकर आणि दुसऱ्या वेळेस दोन असे एकूण पाच एकर क्षेत्रामध्ये त्यांनी कारले लागवड केली आहे.
advertisement
यातील तीन एकर टोमॅटो स्ट्रक्चरवर लागवड केला आहे. याला दोन ते सव्वा दोन महिने झाले. एकूण या शेतीसाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला आहे. तसेच गतवर्षी आहेर यांना 15 लाखांचे उत्पन्न या माध्यमातून मिळाले होते. यंदा देखील त्यांना या कारले पिकातून 16 लाखांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आप्पासाहेब आहेर यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केली आहे.
advertisement
कारल्याची सद्यस्थितीला दुसरी काढणी सुरू आहे. थंडीमुळे कारले काढण्यासाठी थोडा उशीर होत आहे. जूनमध्ये जी कारल्याची काढणी केली जाते ती जलद गतीने होते. कारल्याची शेती गेल्या पाच ते सहा वर्षांपासून करतो मात्र ही शेती बाजाराचा अभ्यास करून सीजनमध्ये करावी लागते. संपूर्ण उत्पन्न हे बाजारभावावर अवलंबून असते सध्याच्या बाजारभावानुसार 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न यामधून मिळेल. यामधून बियाण्यांपासून ते काढणीपर्यंत सर्व खर्च जवळपास अडीच ते तीन लाखांपर्यंत वजा करावे लागेल. बाकीची उर्वरित रक्कम बारा लाख रुपये ही निव्वळ नफा म्हणावी लागेल, असे देखील आहेर यांनी म्हटले आहे.
advertisement
advertisement
नवीन शेतकऱ्यांना कारल्याची लागवड करायची झाल्यास, त्यांनी नक्कीच करावी याबरोबरच इतर पालेभाज्या पिकवून ज्या जमिनीत अवघड होते त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी कारले हा पर्याय उत्तम आहे. तसेच शेतकऱ्यांनी फेरपालट करूनच कारल्याची निवड करावी. जे भाजीपाला क्षेत्रात नवीन आहेत त्यांच्यासाठी कारले हे पीक चांगलं उत्पन्न देणारे आहे. कारल्याची लागवड सात बाय दोन वर करण्यात आली आहे. कोणत्याही वेलवर्गीय पिकामध्ये व्हेंटिलेशन महत्त्वाचे आहे. व्हेंटिलेशन असल्यामुळे कळी पिवळी पडणे, रोगाचा प्रादुर्भाव होणे या बाबी होत नाहीत. या पिकाला मोठे अंतर घेणे महत्त्वाचे आहे.










