Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला आपल्या घरात मानाचं स्थान दिलं आहे.
Shahid Afridi New Home : टी20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान सूपर 8 मध्ये पोहोचली आहे. पाकिस्तानचा सूपर 8 मधला पहिला सामना हा न्यूझीलंडविरूद्ध असणार आहे. या सामन्याला कोलंबोच्या आर प्रेमादासा स्टेडिअवर थोड्याच वेळात सूरूवात होणार आहे. दरम्यान पाकिस्तान सुपर 8 मध्ये पोहोचून देखील पाकिस्तान दिग्गज खेळाडू खुश दिसत नाहीयेत कारण ते पाकिस्तानी खेळाडूंवर टीका करत आहेत.या टीकाकारांमध्ये पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदीचा देखील सहभाग आहे.असे असतानाच शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला आपल्या घरात मानाचं स्थान दिलं आहे.त्यामुळे न्याने 140 कोटी भारतीयांच मन जिंकलं आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.
खरं तर शाहिद आफ्रिदीने नवीन वर्षात नवीन घर घेतलं होतं. त्यानंतर शाहिद आफ्रिदी कराची येथील त्याच्या दीर्घकाळाच्या घरातून पार्कव्ह्यू सिटी, इस्लामाबाद येथील नवीन ठिकाणी कायमचा स्थलांतरित झाला होता. त्याने वैयक्तिक कारणांसाठी हे स्थलांतर केल्याची पुष्टी केली होती.
Shahid Afridi’s new Home.
pic.twitter.com/MKc4URdFxD
— Moments & memories (@momentmemori) February 20, 2026
advertisement
तसेच पाकिस्तानच्या विकास आणि क्रिकेटमध्ये थेट योगदान देण्यासाठी राजधानीत कायमचे स्थायिक होण्याचा आपला हेतू व्यक्त केला होता. शाहिन आफ्रीदीचे नवीन निवासस्थान पार्कव्ह्यू सिटी इस्लामाबादमध्ये आहे, जो त्याच्या आधुनिक पायाभूत सुविधा आणि नैसर्गिक परिसरासाठी ओळखली जाणारी हवेली आहे.
याच हवेलीची झलक त्याने आज एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती. या व्हिडिओमध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या जर्सीने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. आफ्रीदी स्वता: या गोष्टींचा उल्लेख व्हिडिओत करताना दिसत आहे. ही विराट कोहलीने दिलेली जर्सी आहे. ही एबी डिविलियर्सची जर्सी आहे. ही संघकाराची, आणि पाकिस्तानच्या युनूस खानची जर्सी आहे. एकंदरीत या सगळ्या जर्स्या खेळाडू एकमेकांविरूद्ध मैदानात खेळताना देत असतात.एक आठवण म्हणून. पण भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव असताना देखील शाहिद आफ्रीदीने या या जर्सी संग्रहित करून ठेवल्या आहेत. त्यामुळे या व्हिडिओची प्रचंड चर्चा रंगली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 6:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video






