advertisement

सुनेत्रा पवारांच्या शासकीय चालकाला उतरवलं, स्टेअरिंग हाती घेतलं, तटकरेंवर टीका, अनिकेत म्हणतात...

Last Updated:

चिपळूणचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी काल (२० फेब्रुवारी रोजी) सुनेत्रा पवार सावर्डे येथे गेल्या होत्या.

सुनेत्रा पवार-अनिकेत तटकरे
सुनेत्रा पवार-अनिकेत तटकरे
रायगड : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कोकण दौऱ्यात त्यांच्या शासकीय चालकाला बाजूला सारून खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र, माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांच्या गाडीचे सारथ्य केल्याने त्यांच्यावर समाज माध्यमांतून टीका होत आहे. याच टीकेला अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चिपळूणचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी काल (२० फेब्रुवारी रोजी) सुनेत्रा पवार सावर्डे येथे गेल्या होत्या. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर सुनेत्रा पवार विवाहस्थळी जायला निघालेल्या असताना त्यांच्या गाडीचे सारथ्य अनिकेत तटकरे यांनी केले. प्रोटोकॉल तोडून काही घातपात झाला असता तर काय केले असते, अशी टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे. त्यांच्या टीकेला अनिकेत तटकरे यांनी उत्तर दिले.
advertisement

सुनेत्रा काकींच्या गाडीचे सारथ्य करण्याचे भाग्य मला लाभले, अजितदादांचीही गाडी चालवायचो

मी नेहमीच पवार कुटुंबात वावरलेलो आहे. मात्र आमच्या भागात आल्याने सुनेत्रा पवार यांच्या गाडीचे सारथ्य करण्याचे भाग्य मला लाभले. कोणाच्या पोटात पोटशूळ उठत असेल तर ते मला समजले नाही. काकींना माझ्यावर अधिक विश्वास आहे, असे अनिकेत तटकरे म्हणाले.
advertisement

बोचऱ्या टीकेवर धारदार पलटवार

राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या चिपळूण दौऱ्याप्रसंगी वाहन चालवताना व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून आक्षेप घेण्यात आला. अनिकेत तटकरे यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. मात्र या टीकेला उत्तर देताना अनिकेत तटकरे म्हणाले, "आम्ही तटकरे कुटुंब नेहमीच पवार कुटुंबाच्या सोबत वावरलो आहे. त्यामुळे त्यांच्या वाहनाचे सारथ्य करण्याचे काम गैर असल्याचे मला वाटत नाही. कारण याआधी सुद्धा मी अजित पवार यांच्यासह अन्य नेते मंडळींच्या वाहनांचे स्टेअरिंग हाती घेतलं आहे आणि त्याचे मला भाग्य लाभल्याने जर का कोणाच्या पोटात पोटशूळ होत असेल तर मला याबाबत मी याबाबत काय करू शकतो?"
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सुनेत्रा पवारांच्या शासकीय चालकाला उतरवलं, स्टेअरिंग हाती घेतलं, तटकरेंवर टीका, अनिकेत म्हणतात...
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement