संभाजीनगरमधील पैठणच्या नाथ हायस्कूलमध्ये पोलिसांच्या समोरच दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही तरुण विद्यार्थ्यांना दुसऱ्या मजल्यावरती चढून ही कॉपी पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यात कॉपीमुक्त अभियानाचा पुर्ण फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. या अभियानावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत.



