advertisement

 पुणे स्टेशन हादरलं! MP ला निघाली अन् प्लॅटफॉर्मवरच चिमुरडीवर अत्याचार,काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Last Updated:

गावी परतण्यासाठी आई-वडिलांसोबत स्थानकावर थांबलेल्या अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर मध्यरात्रीच्या सुमारास लैंगिक अत्याचार करण्यात आला.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या गावी परतण्यासाठी आई-वडिलांसोबत स्थानकावर थांबलेल्या अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर मध्यरात्रीच्या सुमारास लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका नराधमाला अटक केली असून, या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास सुरू आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही मूळची मध्य प्रदेश राज्यातील आहे. तिचे आई-वडील महाराष्ट्रात ऊसतोडणी मजूर म्हणून आले होते. ऊसतोडणीचा हंगाम संपल्यानंतर हे कुटुंब चार लहान मुलांसह पुन्हा आपल्या गावी जाण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. मध्य प्रदेशला जाणारी गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी असल्याने हे कुटुंब प्लॅटफॉर्मवरच मुक्कामाला थांबले होते.
advertisement

त्या रात्री नेमकं काय घडलं? 

आरोपी देखील याच कुटुंबाच्या शेजारी प्लॅटफॉर्मवर ट्रेनसाठी थांबला होता, त्यामुळे त्यांची प्राथमिक ओळख झाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास आई-वडील आणि इतर मुले गाढ झोपेत असताना चार वर्षांची ही बालिका जागी असल्याचे पाहून आरोपीची तिच्यावर नजर टाकली. त्याने या चिमुरडीला चॉकलेट आणि बिस्किटे देण्याचे आमिष दाखवले. खाऊच्या बहाण्याने त्याने या बालिकेला आई-वडिलांच्या जवळून उचलून प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ च्य शेवटी जिथे अंधार आणि निर्जनता होती, तिथे नेले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला.
advertisement

आरोपी आणि पीडिता दोघेही परप्रांतीय 

काही वेळाने मुलगी दिसून न आल्याने आई-वडिलांनी शोधाशोध सुरू केली. मुलीच्या ओरडण्यामुळे आणि संशयास्पद हालचालींमुळे हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पुणे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेत एका आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी देखील परप्रांतीय असल्याचे निष्पन्न झाले आहे.

'पोक्सो' कायद्यांतर्गत  गुन्हा दाखल

advertisement
लोहमार्ग पोलिसांनी पीडित बालिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत कठोर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेत आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यादृष्टीने स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे.
advertisement

महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या, विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानकावर हजारो प्रवाशांचा वावर असताना भरवस्तीत अशा प्रकारचे कृत्य घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
 पुणे स्टेशन हादरलं! MP ला निघाली अन् प्लॅटफॉर्मवरच चिमुरडीवर अत्याचार,काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Next Article
advertisement
Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं
  • पाकिस्तानच्या शाहिन आफ्रीदीच्या व्हिडिओची चर्चा

  • सचिन तेंडुलकर विराटशी ठेवलं खास कनेक्शन

  • आफ्रीदीच्या त्या कृतीने भारतीय फॅन्स खुश

View All
advertisement