advertisement

कोणत्या बँकेतून Home Loan घ्यायचे? व्याजदरांची नवी यादी जाहीर; EMI कसा होईल कमी अन् दीर्घकालीन कालावधीत मोठी बचतही

Last Updated:

Home Loan Interest Rates: घर खरेदीपूर्वी विविध बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या गृहकर्ज व्याजदरांची तुलना करणे अत्यावश्यक ठरते. योग्य पर्याय निवडल्यास ईएमआय कमी होऊन दीर्घकालीन बचत शक्य आहे.

News18
News18
मुंबई: घर खरेदीचा निर्णय घेताना सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे योग्य होम लोन निवडणे. केवळ “सुरुवातीचा कमी व्याजदर” पाहून निर्णय घेतला तर पुढे EMIचा ताण वाढू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम विविध बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांच्या व्याजदरांची सविस्तर तुलना करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक बँक वेगवेगळ्या दरांवर आणि अटींवर कर्ज उपलब्ध करून देते. त्यामुळे योग्य पर्याय निवडल्यास तुमची ईएमआय कमी होऊ शकते आणि दीर्घकालीन कालावधीत मोठी बचतही होऊ शकते.
फेब्रुवारी 2026 मध्ये सरकारी बँका, खासगी बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या वेगवेगळ्या दरांनी कर्ज देत आहेत. मात्र सर्वात कमी व्याजदर प्रामुख्याने चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांनाच मिळतो, हे लक्षात ठेवावं.
सरकारी बँकांचे होम लोन व्याजदर
बँक ऑफ इंडिया: 7.10% ते 10.25%
बँक ऑफ महाराष्ट्र: 7.10% ते 9.90%
सेंट्रल बँक ऑफ इंडिया: 7.10% ते 9.15%
advertisement
इंडियन ओव्हरसीज बँक: 7.10% पासून पुढे
युनियन बँक ऑफ इंडिया: 7.15% ते 9.50%
यूको बँक: 7.15% ते 9.25%
इंडियन बँक: 7.15% ते 9.55%
खासगी बँकांचे व्याजदर
ICICI बँक: 7.45% पासून
HSBC बँक: 7.45% पासून
फेडरल बँक: 7.50% ते 9.50%
कोटक महिंद्रा बँक: 7.70% पासून
HDFC बँक: 7.75% पासून
साउथ इंडियन बँक: 7.80% पासून
advertisement
तमिळनाड मर्कंटाइल बँक: 7.90% ते 9.30%
अ‍ॅक्सिस बँक: 8.00% ते 11.90%
हाऊसिंग फायनान्स कंपन्यांचे दर
LIC हाऊसिंग फायनान्स: 7.15% पासून
बजाज हाऊसिंग फायनान्स: 7.15% पासून
ICICI होम फायनान्स: 7.50% पासून
PNB हाऊसिंग फायनान्स: 7.50% पासून
टाटा कॅपिटल: 7.50% पासून
गोदरेज हाऊसिंग फायनान्स: 7.60% पासून
आदित्य बिर्ला कॅपिटल: 7.75% पासून
होम लोन घेण्यापूर्वी या गोष्टी तपासा
advertisement
  • फक्त जाहिरातीतला “कमी दर” पाहून निर्णय घेऊ नका.
  • तुमचा क्रेडिट स्कोअर, उत्पन्न आणि प्रोफाइल यावर अंतिम दर ठरतो.
  • प्रोसेसिंग फी, लीगल चार्ज, टेक्निकल फी यांसारखे लपलेले खर्च तपासा.
  • फ्लोटिंग रेट असल्यास त्याचा रीसेट सायकल (दर किती कालावधीनंतर बदलतो) समजून घ्या.
योग्य तुलना करून कर्ज घेतल्यास तुमची EMI लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते आणि संपूर्ण कर्ज कालावधीत लाखोंची बचत होऊ शकते. घर खरेदीपूर्वी हा छोटा अभ्यास भविष्यातील आर्थिक ताण टाळू शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
कोणत्या बँकेतून Home Loan घ्यायचे? व्याजदरांची नवी यादी जाहीर; EMI कसा होईल कमी अन् दीर्घकालीन कालावधीत मोठी बचतही
Next Article
advertisement
Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं
  • पाकिस्तानच्या शाहिन आफ्रीदीच्या व्हिडिओची चर्चा

  • सचिन तेंडुलकर विराटशी ठेवलं खास कनेक्शन

  • आफ्रीदीच्या त्या कृतीने भारतीय फॅन्स खुश

View All
advertisement