'माझं अस्तित्व कधीच संपलं असतं', घटस्फोटाबद्दल स्पष्टच बोलली अंकुश चौधरीची हिरोईन, महिलांना दिला मोलाचा मंत्र
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अभिनेत्रीने एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात कठीण वळणावर म्हणजेच तिच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
ती म्हणाली, "घटस्फोटाचा तो काळ माझ्यासाठी एखाद्या वादळासारखा होता. आपण एका सुरक्षित कवचात जगत असतो आणि अचानक ते कवच काढून घेतलं जातं, तेव्हा माणूस हादरून जातो. त्यावेळी मी जर स्वतःला सावरलं नसतं, तर माझ्यातली कलाकार, एक आई आणि एक स्वतंत्र स्त्री म्हणून माझं अस्तित्व कधीच संपलं असतं. मी फक्त आयुष्य रेटत राहिले असते, जगले नसते."
advertisement
घटस्फोटाच्या प्रक्रियेत होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल बोलताना स्मिताने एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं. ती म्हणाली, "अनेकदा असं वाटतं की माझ्यासोबतच हे का घडतंय? मी कोणाचं काय वाईट केलंय? जर आपली चूक असेल तर आपण ती मान्य करतो, पण जेव्हा आपली काहीच चूक नसते आणि तरीही हे भोगावं लागतं, तेव्हा त्या परिस्थितीला सामोरं जाणं खूप कठीण असतं."
advertisement
advertisement
स्मिताच्या मते, त्या वाईट घटनेनेच तिला आज अधिक खंबीर बनवलं आहे. ती सांगते की, "आज जेव्हा मी मागे वळून बघते, तेव्हा जाणीव होते की जे काही घडलं, त्यामागे काहीतरी कारण होतं. त्या धक्क्यानेच मला बाऊन्स बॅक करण्याची ताकद दिली. एकदा का तुम्ही पाय रोवून उभे राहिलात की मग जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हलवू शकत नाही."
advertisement
ज्या स्त्रिया सध्या अशाच कठीण प्रसंगातून जात आहेत, त्यांच्यासाठी स्मिताने एक मोलाचा मंत्र दिला आहे. ती म्हणते, "तुम्ही थकलात, संपलात असं वाटलं की थोडं थांबा. तो पॉज खूप महत्त्वाचा असतो. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला वेळ द्या. त्या थांबण्यानंतर तुमच्यात १०० मैल धावण्याची ताकद येईल. ही सहनशक्ती आणि ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये उपजतच असते."









