तेजस्वी प्रकाशनं वांद्र्यात घेतलं कोट्यवधींचं घर, पण स्वत:च्याच घरात 4 वर्षे राहता येणार नाही! नेमकी अडचण काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशनं वांद्रे येथे कोट्यवधींचं घर खरेदी केलं आहे. पण स्वत:च्याच घरात तेजस्वी चार वर्ष राहू शकणार नाहीये. नेमकी अडचण काय आहे?
टीव्हीची 'नागीन' तेजस्वी प्रकाशने मुंबईच्या प्रसिद्ध शहरात तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 'बिग बॉस 15' ची विजेती, तेजस्वीने पॉश वांद्रे पश्चिम परिसरात तिचे स्वप्नातील घर खरेदी केले आहे. मुंबईच्या पॉश वांद्रे रिक्लेमेशन परिसरात हा नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. या आलिशान मालमत्तेची नोंदणी16 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण झाली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तेजस्वी प्रकाश ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. 'बिग बॉस 15' ट्रॉफी जिंकल्यानंतर तिची लोकप्रियता वाढली. त्यानंतर ती 'नागिन 6' या सुपरहिट शोने घराघरात पोहोचली. तिने अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला नसला तरी तिने 'मन कस्तुरी रे' या मराठी चित्रपटातून तिचे अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. तेजस्वी लवकरच 25 फेब्रुवारी रोजी प्रसारित होणाऱ्या 'सायको सैयाँ' या नवीन वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.
advertisement
तेजस्वी प्रकाशनं खरेदी केलेल्या आलिशान फ्लॅटची किंमत अंदाजे 7.63 कोटी असल्याचा अंदाज आहे. या भव्य मालमत्तेची नोंदणी नुकतीच 16 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण झाली. तेजस्वीला तिच्या स्वप्नातील घरात राहण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल, कारण इमारत सध्या बांधकामाधीन आहे आणि अहवालानुसार तिला 2030 पर्यंत ताबा मिळेल.










