T20 World Cup : पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये ड्रामा, कॅप्टनला गप्प का केलं? कोचने सगळं बाहेर काढलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यातल्या सामन्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा आणि मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांच्यात वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता.
कोलंबो : टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि नामिबिया यांच्यातल्या सामन्यावेळी पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा आणि मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांच्यात वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. डग आऊटमध्ये बसलेला सलमान आगा संतापला असून त्याने आपल्या हातातली पाण्याची बाटली फेकल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सलमानसोबत बाबर आझम आणि कोच माईक हेसनही होते. सलमान आगाने बाटली फेकल्यानंतर माईक हेसन त्याला शांत राहायला सांगायचे हावभाव करतानाही दिसले. या व्हिडिओच्या वादावर स्वत: माईक हेसन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
'मीदेखील तो व्हिडिओ पाहिला आहे, तुम्ही खरंच चुकला आहात. नवाज हा डावखुरा बॅटर आहे, त्यामुळे त्याला पॅड घालायला सांग, असं मी सलमानला सांगत होतो, पण तेव्हाच आगा आऊट झाला होता, म्हणून तो नाराज होता, त्यामुळे त्याने बाटली फेकली. आमच्यात झालेल्या संभाषणाचा याच्याशी काहीही संबंध नव्हता', असं माईक हेसन म्हणाले आहेत.
advertisement
सलमानला गप्प का केलं?
'सलमान आऊट झाल्यामुळे नाराज होता, त्यातून हे घडलं. लोक कधीकधी काहीही अर्थ लावतात. लेफ्ट आर्म स्पिनरची बॉलिंग संपल्यानंतर आम्ही गप्प बसण्याबद्दल बोललो,', अशी प्रतिक्रिया माईक हेसन यांनी दिली आहे.
नामिबियाविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानची टीम सुपर-8 मध्ये क्वालिफाय झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानचा युएसए, नेदरलँड्स आणि नामिबियाविरुद्ध विजय झाला, तर भारताविरुद्ध त्यांना पराभवाचा धक्का बसला. सुपर-8 मध्ये पाकिस्तानचा सामना न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. सेमी फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तानला या 3 सामन्यांपैकी कमीत कमी 2 सामने तरी जिंकावे लागणार आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 8:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : पाकिस्तानच्या डगआऊटमध्ये ड्रामा, कॅप्टनला गप्प का केलं? कोचने सगळं बाहेर काढलं!









