advertisement

Pune : दुचाकीवरून आले-वार करून गेले... पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर अल्पवयीन पोरावर जीवघेणा हल्ला

Last Updated:

१७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.

पुणे सिंहगड रस्ता खून प्रकरण
पुणे सिंहगड रस्ता खून प्रकरण
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : कित्येक प्रयत्न करूनही पुण्यातल्या कोयता गँगची दहशत कमी केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. सिंहगड रस्त्यावर अल्पवयीन मुलावर एका टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
१७ वर्षीय अल्पवयीन मुलावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. पुण्यातील माणिकबाग भागात सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बर्गर किंग दुकानासमोर दोन दुचाकींवरून आलेल्या चार तरुणांनी तोंडाला रूमाल बांधून तरुणावर हल्ला चढवला.

मुलगा रक्ताच्या थारोळ्यात, टोळक्याच्या दहशतीने सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत

हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करत मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड रस्त्यावर टोळक्याच्या दहशतीने सर्वसामान्य नागरिक भीतीच्या छायेत आहेत.
advertisement

मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू, पोलिसांकडून गुन्हा दाखल

जखमी अल्पवयीन मुलाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कळते आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक

पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अलीकडच्या काळात विविध घटनांमुळे चर्चेत आहेत. कधी कोयता गँगकडून हल्ल्यावर हल्ले, कधी अंतर्गत टोळीयुद्ध, कधी वाहनांची तोडफोड आदी घटनांमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. पुणे पोलीस गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जंग जंग पछाडतायेत. मात्र गुन्हेगारीचा पूर्ण बिमोड करण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune : दुचाकीवरून आले-वार करून गेले... पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर अल्पवयीन पोरावर जीवघेणा हल्ला
Next Article
advertisement
Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं
  • पाकिस्तानच्या शाहिन आफ्रीदीच्या व्हिडिओची चर्चा

  • सचिन तेंडुलकर विराटशी ठेवलं खास कनेक्शन

  • आफ्रीदीच्या त्या कृतीने भारतीय फॅन्स खुश

View All
advertisement