advertisement

Solapur Crime : जिवंत पत्नीचं मृत्यू प्रमाणपत्र काढलं, दुसरं लग्नही केलं! पण 'एका' चुकीने फुटलं सोलापूरच्या तरुणाचं बिंग!

Last Updated:

Solapur Crime News : सोलापूर शहरातील एका व्यक्तीने लातूरमध्ये चक्क आपली पहिली पत्नी जिवंत असतानाच तिचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र मिळवून दुसरे लग्न उरकलं आहे.

Solapur Crime Man obtained death certificate for his living wife
Solapur Crime Man obtained death certificate for his living wife
Solapur Crime News : सोलापुरात सध्या एकाच गोष्टीची चर्चा सुरू असते, ते म्हणजे लग्न... पोरांना पोरी मिळत नसल्याने सालापुरातील तरुणाईची मोठी पंचाईत झाल्याचं पहायला मिळतंय. पाहुण्या रावळ्यांच्यात उठबस सुरू असताना पोराला पोरगी मिळतीये का पाहणं यात आईबापाची मोठी दमछाक होताना दिसतीये. अशातच एकीकडे पोरांची वय वाढत असताना एका पठ्ठ्यानं थेट दुसरं लग्न केलं, तेही मोठी फसवाफसवी करून... तरुणाचं भिंग कसं फुटलं? पाहा संपूर्ण स्टोरी...

खोटं मृत्यू प्रमाणपत्र मिळवून दुसरं लग्न उरकलं

सोलापूर शहरातील एका व्यक्तीने लातूरमध्ये चक्क आपली पहिली पत्नी जिवंत असतानाच तिचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र मिळवून दुसरे लग्न उरकलं आहे. सोलापूर येथील रहिवासी असलेल्या वैभव गोपीनाथ जाधव याने हा बनाव रचला असून, आता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने 23 मे 2023 ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत लातूर महापालिकेत खोटी कागदपत्रे सादर केली होती.
advertisement

कागदपत्रांच्या आधारे दुसरं लग्न

प्रशासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करत त्याने आपली पत्नी मृत झाल्याचे भासवले आणि त्याआधारे महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडून अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र देखील मिळवून घेतले. या कागदपत्रांच्या आधारे त्याने दुसरे लग्न केले.

दुसऱ्या विवाहाची नोंदणी रेकॉर्डमध्ये 

लातूर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश शंकरराव पाटील यांनी या संदर्भात अधिकृत तक्रार दिली आहे. आरोपीने केवळ खोटे प्रमाणपत्र मिळवले नाही, तर त्याआधारे केलेल्या दुसऱ्या विवाहाची नोंदणी देखील महापालिकेच्या रेकॉर्डमध्ये करून घेतली. या सर्व प्रकारामुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून फसवणुकीचे गांभीर्य वाढले आहे.
advertisement

संशय आल्याने अंतर्गत पडताळणी

दरम्यान, काही दिवसांनंतर संबंधित विभागाला संशय आल्याने अंतर्गत पडताळणी करण्यात आली. या चौकशीत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये मोठी विसंगती असल्याचे समोर आले आणि पत्नी जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. या गंभीर प्रकारानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने पोलिसांत धाव घेत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur Crime : जिवंत पत्नीचं मृत्यू प्रमाणपत्र काढलं, दुसरं लग्नही केलं! पण 'एका' चुकीने फुटलं सोलापूरच्या तरुणाचं बिंग!
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement