Free Bus Service : मुंब्रा स्थानक ते शिळफाटा प्रवास आता पूर्णपणे मोफत; कुणाला फायदा?
Last Updated:
Free Bus Service : मुंब्रा स्थानकात मोफत बस सेवा सुरु झालेली आहे. पण याचा नेमका फायदा कोणत्या प्रवाशांना होणार आहे आणि कधीपर्यंत होणार आहे त्याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेऊयात.
मुंब्रा : पवित्र रमजान महिन्यात रोजा सोडण्यासाठी मुस्लीम बांधवांना वेळेत घरी पोहोचता यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने विशेष मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. जाणून घ्या ही बससेवा कुठून कुठपर्यंत सुरु करण्यात येणार आली आहे.
रमजानमधील प्रवासाची अडचण दूर
मिळालेल्या माहितीनुसार ही बस सेवा मुंब्रा रेल्वे स्थानक ते शिळफाटा या मार्गावर सुरू असून दररोज सायंकाळी मोठ्या संख्येने नागरिक याचा लाभ घेत आहेत.
रमजानमध्ये संध्याकाळी इफ्तारच्या वेळी अनेक जण कामावरून किंवा प्रवासातून परतत असतात. रेल्वे आणि रस्त्यावरील गर्दीमुळे घरी पोहोचण्यास उशीर होतो. ही अडचण लक्षात घेऊन ही मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर घरी पोहोचणे शक्य होत आहे.
advertisement
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेवक शानू पठाण, यासिन कुरेशी, नगरसेविका मनीषा भगत तसेच मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमिम खान उपस्थित होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 18 वर्षांपासून ही सेवा सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
रमजानभर मोफत बससेवा सुरूच राहणार
स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून रमजान काळात ही बस सेवा नियमित सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 8:58 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Free Bus Service : मुंब्रा स्थानक ते शिळफाटा प्रवास आता पूर्णपणे मोफत; कुणाला फायदा?









