चारही नगरपालिकेमध्ये भाजपला धक्का
ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला होती. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपली रणनीती गुलदस्त्यात ठेवत सस्पेन्स कायम ठेवला होता. मोहिते-पाटील कुटुंबाचा या परिसराशी चार पिढ्यांचा ऋणानुबंध असल्याने, हा बालेकिल्ला राखण्यात यश आहे. एवढंच नाही तर मोहिते पाटलांची ताकद असलेल्या चारही नगरपालिकेमध्ये भाजपला धक्का बसला आहे.
advertisement
शहाजी बापू पाटील यांना मोहिते पाटलांची साथ
माढा लोकसभा मतदारसंघातील करमाळा, कुर्डूवाडी, सांगोला आणि अकलूज अशा चारही नगरपालिकेमध्ये भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा माढा मतदार संघातील नगरपालिकेत मोहिते पाटील गटाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या वर्चस्व दिसून आलं. सांगोल्या शिवसेना शिंदे गड जरी निवडून आला असला तरी अप्रत्यक्षपणे शहाजी बापू पाटील यांना मोहिते पाटील यांची साथ लाभली होती. त्यामुळे माढ्यातील चार नगरपालिकांवर मोहिते-पाटील पॅटर्न दिसून येतोय.
धुरंदर सिनेमाची क्रेझ थेट
करमाळ्यात मोहिनी संजय सावंत यांनी विजय मिळवला तर सांगोल्यात नंदकिशोर मुंदडा यांनी बाजी मारली. तसेच अकलूजमध्ये रेश्मा आडगळे यांना यश मिळालं. तर कुर्डूवाडीत जयश्री भिसे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर धुरंदर सिनेमाची क्रेझ थेट विरोधकांवर आरोप करताना अकलूज मध्ये दिसून आली.
" घायल हू... इसिलिए घातक हू.."
दरम्यान, अकलूज येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपवर निशाणा साधत असताना , " घायल हू... इसिलिए घातक हू.." अशा प्रकारची डायलॉगबाजी केली.त्यामुळे धुरंधर सिनेमाची क्रेझ मोठ्या प्रमाणावर अकलूजच्या राजकारणात दिसली. अकलूज पालिका निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध भाजपा असा संघर्ष झाला होता. आज निकालात मोहिते पाटील यांचे वर्चस्व निकालावर दिसून आले. याचवेळी धुरंधरचा डायलॉग भाजपावर आरोप करताना वापरण्यात आला.
