मध्य रेल्वेने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 3 रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे-मिरज, मिरज-नागपूर आणि मिरज – लातूर या तीन गाड्यांचा समावेश आहे. यातील मिरज-लातूर ही गाडी 6 जुलै रोजी आणि इतर विशेष गाड्या 8 जुलै रोजी चालवल्या जातील.
Ashadhi Wari 2025: दगडातून पांडुरंग घडवणारे हात! आषाढीसाठी काम जोरात, 3 फुटाची मूर्ती कितीला?
advertisement
विशेष गाड्यांचं वेळापत्रक
मिरज ते लातूर विशेष रेल्वे
मिरज – लातूर (गाडी क्रमांक 01409) ही विशेष रेल्वे 6 जुलै 2025 रोजी चालवण्यात येईल. या दिवशी ही गाडी मिरज रेल्वे स्थानकावरून सकाळी नऊ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 7 वाजून 20 मिनिटांनी ही गाडी आपल्या गंतव्यस्थानी म्हणजेच लातूर रेल्वे स्टेशनवर पोहोचेल. ही गाडी या प्रवासादरम्यान आगर, कवठे महांकाळ, ढालगांव, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डूवाड, शेंद्री, बार्शी, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब, ढोकी, मुरूड, औसा रस्ता आणि हरंगुळ अशा महत्त्वाच्या स्टेशनवर थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पुणे ते मिरज विशेष रेल्वे
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी पुणे – मिरज विशेष रेल्वे (गाडी क्रमांक 01413) ही गाडी 8 जुलै 2025 रोजी सकाळी 7 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना होईल आणि दुपारी 12.30 वाजता मिरज रेल्वे स्थानकावर पोहोचेल. मध्य रेल्वेच्या माध्यमातून ही एकेरी विशेष गाडी लोणंद, सातारा, कराड, किर्लोसकरवाडी आणि सांगली या मार्गाने चालवली जाईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिरज ते नागपूर विशेष रेल्वे
आषाढी वारीसाठी मिरज – नागपूर एकेरी विशेष (क्रमांक 01213) 8 आठ जुलै 2025 रोजी चालवली जाईल. ही गाडी मिरज रेल्वे स्थानकातून दुपारी 10 वाजून 55 मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी साडेबारा वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. या प्रवासादरम्यान ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती आहे. ही गाडी श्रीक्षेत्र पंढरपूर सहित पश्चिम महाराष्ट्र, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव सहित उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेईल.