सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील प्रा. उमा बिराजदार आणि रुद्रप्पा बिराजदार या भावंडांनी आध्यात्मिक प्रेरणा घेतली आणि त्यातून गोशाळा उभारली. या गोशाळेत त्यांनी बचत गटाच्या 250 ते 300 महिलांना रोजगारदेखील उपलब्ध करुन दिला आहे. यासोबतच या दोन्ही बहीण भावांनी स्वतःच्या शेतात गोसेवा सुरू केली आहे.
गायीच्या शेणाला किती महत्त्व आहे, याविषयी उलटसुलट चर्चा नेहमीच होत असते. कित्येकांना ते पटते तर अनेकांना त्यात तथ्य आहे, असे वाटत नाही. मात्र, गायीच्या उपयुक्ततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. हे सोलापूरच्या प्रा. उमा बिराजदार यांनी आपल्या कटव्वादेवी गोशाळेत सिद्ध केले आहे.
advertisement
onion farming : कांद्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, पीक कसं वाचवाल?, महत्त्वाची माहिती
त्यांनी खिल्लार गायीच्या शेणापासून गोवऱ्या तयार केल्या आहेत. तसेच या गोवऱ्यांची आता सोलापूर शहरासह, मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यात विक्री केली जाते. अग्निहोत्रात हवनासाठी देशी गायीच्या शुद्ध शेणाच्या गोवऱ्या लागतात. त्यामुळे या गोवऱ्याची मागणी सुद्धा वाढत आहे.
कोणतीही भेसळ न करता पाच इंची गोलाकार गोवऱ्यांना या ठिकाणी तयार केले जाते. एका पाकीटमध्ये 11 गोवऱ्या असतात आणि ते 25 रुपयाला विक्री केले जाते. भारतीय नागरिक पूजेसाठी, होम हवनासाठी गोवऱ्यांचा वापर करतात.
पहिल्यांदाच पाहता येणार महाराणी येसुबाईंची नाममुद्रा, साताऱ्यात होतेय गर्दी, जाणून घ्या इतिहास
प्रा. उमा बिराजदार यांनी तयार करीत असलेल्या गोवऱ्यांना जास्त मागणी आहे. कारण म्हैस, बैल किंवा अन्य प्राण्यांच्या शेणाची भेसळ ते करीत नाहीत. गोवऱ्यांच्या उत्पन्नातून गोशाळेचा खर्च भागवला जातो. गोवऱ्याच्या विक्रीतून वर्षाला 4 ते 5 लाखांची उलाढाल होत आहे.