TRENDING:

Pandharpur : चंद्रभागेत स्नान केलं पण पांडुरंगापर्यत पोहोचू शकले नाहीत, वाटेतच काळाचा घाला! नेमकं काय घडलं?

Last Updated:

Pandharpur News :5 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल मंदिराच्या दिशेने जात असताना रामदास पडघान यांच्यावर काळाला घाला झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Warkari Dies Of Heart Attack : आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर आणि पंढरपूर वारीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पंढरपूरला गेलेल्या एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वारकऱ्याला नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या.
Pandharpur Warkari Dies Of Heart Attack
Pandharpur Warkari Dies Of Heart Attack
advertisement

छातीत तीव्र वेदना

चिखली तालुक्यातील कवठळ येथील रहिवासी असलेले रामदास पडघान (42) हे नेहमीप्रमाणे गावातील ४०-५० भाविकांसोबत पंढरपूरच्या वारीसाठी गेले होते. ५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल मंदिराच्या दिशेने जात असताना, रामदास आणि त्यांच्या सोबतचे भाविक रस्त्यावर फळे विकत घेऊन एका ठिकाणी बसून फळे खात होते. याच दरम्यान, रामदास पडघान यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या.

advertisement

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सोबत असलेल्या गावकऱ्यांनी आणि वारीतील सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचं निधन झालं. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुरलेल्या एका भक्ताचा असा अनपेक्षित अंत झाल्याने सर्व वारकरी आणि गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.

advertisement

पोलिसांचा पंचनामा

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि नैसर्गिक मृत्यूची नोंद दाखल केली. रामदास पडघान यांचा मृतदेह घेऊन पंढरपूरला गेलेले सर्व भाविक आपल्या गावी कवठळ येथे परतले आहेत. रामदास पडघान यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि वृद्ध आई-वडिलांवर अचानक जबाबदारी आणि दुःखाचा भार पडला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Pandharpur : चंद्रभागेत स्नान केलं पण पांडुरंगापर्यत पोहोचू शकले नाहीत, वाटेतच काळाचा घाला! नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल