खिडकीतून पाहिलं अन् धक्का बसला
बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात अंकिता यांनी हे निर्दयी कृत्य केले. घटनेच्या वेळी अंकिता मुलासह घरात एकटीच होत्या. घरकामासाठी आलेल्या एका महिलेने घरात कोणी दिसत नसल्याने खिडकीतून पाहिले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला. आईने विष पाजलेल्या या 14 महिन्यांच्या मुलाला तातडीने उपचारांसाठी बार्शी येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले होते.
advertisement
14 महिन्याचं बाळ अतिदक्षता विभागात
मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, जिथं त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत. 14 महिन्याचं बाळ अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे. अंकिता हिचं लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे याच्याशी झालं होतं. घटनेच्या वेळी घरातील सर्व लोक कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता घरात चिमुकल्यासह एकटीच होती, अशी माहिती समोर आली आहे.
आत्महत्येमागील नेमकं कारण काय?
दरम्यान, अंकिता उकिरडे यांचे चार वर्षांपूर्वी वैभव उकिरडे यांच्यासोबत लग्न झालं होतं. या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास बार्शी शहर पोलीस कसून करत आहेत.
