TRENDING:

17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून डोळे मिटले अन्..., सोलापुराती प्रसिद्ध उद्योजकाचं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Last Updated:

Solapur News: सोलापुरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक उद्योजक सुनील सदारंगानी हे अपार्टमेंटच्या 17 व्या मजल्यावर गेले. तिथलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: शहरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक आणि उद्योजक सुनील मोतीलाल सदारंगानी (वय 55) यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. विजयपूर महामार्गावरील पनाश अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. निर्माणाधीन असणाऱ्या अपार्टमेंटच्या 17 व्या मजल्यावरून उडी घेत त्यांनी स्वत:ला संपवले. या प्रकरणाची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सुरू आहे.
17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून डोळे मिटले अन्..., सोलापुराती प्रसिद्ध उद्योजकाचं टोकाचं पाऊल, काय घडलं?
17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून डोळे मिटले अन्..., सोलापुराती प्रसिद्ध उद्योजकाचं टोकाचं पाऊल, काय घडलं?
advertisement

सुनील सदारंगानी यांच्या आत्महत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये आत्महत्येपूर्वी सदारंगानी काही काळ 17व्या मजल्यावर थांबले होते. त्यांनी हात जोडून प्रार्थना केली, काही वेळ स्तब्ध उभे राहिले आणि नंतर खाली झोपून इमारतीवरून खाली कलांडले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोठा आवाज ऐकून अपार्टमेंटमधील नागरिक घटनास्थळी जमा झाले.

पत्नीनं ‘त्याच्या’सोबत हॉटेल सुरू केलं, पतीला खटकलं, सत्तूर घेतला अन्..., सोलापूर हादरलं!

advertisement

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे व विलास घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

कोण आहेत सदारंगानी?

सुनील सदारंगानी हे सोलापुरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक होते. तसेच ते राजकुमार राठी यांचे जावई होते. काही वर्षांपूर्वी मुलतानी बेकरी बंद पडली होती. त्यानंतर ते पुण्यात वास्तव्यास गेले होते. पुण्याच्या खराडी भागात ते राहात होते. गेल्या काही वर्षांपासून सदारंगानी हे आर्थिक अडचणींचा सामना करत होते. तसेच त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार देखील सुरू असल्याची माहिती नातेवाईक आणि मित्रांनी पोलिसांना दिली.

advertisement

आज अंत्यविधी होणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणे-मुंबईचा नाद सोडला अन् गाव गाठलं, अर्ध्या एकरात केली शेती, 3 महिन्यात लखपती
सर्व पहा

सुनील सदारंगानी हे 4-5 दिवसांपूर्वीच पत्नीसह सोलापुरात आले होते. आता ते सोलापुरात स्थायिक होण्याच्या विचारात होते. त्यांना दोन मुले असून एक मुलगा अमेरिकेत तर दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. अमेरिकेत असणारा मुलगा सोलापूरला येत आहे. त्यामुळे आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून डोळे मिटले अन्..., सोलापुराती प्रसिद्ध उद्योजकाचं टोकाचं पाऊल, काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल