सोलापुरात सूर्यदर्शन नाहीच
सोलापुरात गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. कधी जोरदार तर कधी पावसाची रिपरिप सुरू होती. परंतु, या पावसाने सोलापूरकरांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे शुक्रवारी सोलापूरच्या तापमानात मोठी घट झाली. कमाल तापमान आणि किमान तापमान एकाच पातळीवर आल्याचे चित्र होते. कमाल तापमान 23.6 तर किमान तापमान 23.0 अशं सेल्सिअस नोंदवले गेले.
advertisement
Weather Alert: धोक्याची घंटा! पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुणे, सोलापूरसह 5 जिल्ह्यांना अलर्ट
दोन दिवसांत पुन्हा पूर?
सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून बचावकार्यासाठी कोल्हापूर आणि सांगलीकडून नवीन पथके बोलावण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
प्रशासनाकडून तयारी
सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांत महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्यास धोका वाढणार आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून त्याबाबत संबंधित प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराची पथके शनिवारी दुपारपर्यंत सोलापुरात थंबणार आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, लातूर आणि धाराशिवकडून आलेल्या बचाव पथकांना परत पाठवले आहे.