चार महिने जुना व्हिडीओ?
हॉटेल मधील मॅनेजरने केलेल्या चुकीमुळे (Solapur Crime News) त्याला अक्षरशः नग्न करुन लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा आरोप केला जात होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. हॉटेलच्या मालकाने मॅनेजरला मारहाण हॉटेलच्या सर्व स्टाफ समोर केली होती, या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता या प्रकरणात हॉटेल 7777 च्या मालकाने व्हिडीओ शेअर करत व्हिडीओ चार महिने जुना आलल्याची माहिती दिली आहे.
advertisement
मॅनेजरने स्वत: केला खुलासा
माझी चुकीची माहिती दिली जात आहे. मी मॅनेजरला मारहाण केलेला व्हिडीओ व्हायरल होतोय, पण त्यादिवशी वेगळंच घडलं होतं. त्यावेळी मॅनेजरने स्वत: खुलासा केला. मी ड्रिंक करून आलो होतो, मी नग्न अवस्थेत होतो. मालकांनी मला पाहिल्यावर त्यांनी मला मारलं, असं मॅनेजरने म्हटलं आहे. मॅनेजर नग्न अवस्थेत हॉटेलमध्ये राडा केला होता. त्या परिस्थितीत मी क्रुर भावनेने माझा व्हिडीओ काढला. बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. कायद्याच्या मार्फत मी पाऊल उचलणार, असं मालकाने म्हटलं आहे.
मी फरार नाही - हॉटेल 7777 चे मालक
दरम्यान, माझी क्रुर कोणताही भावना नव्हती. हा व्हिडीओ चार महिन्यापूर्वीचा आहे. मारहाणीनंतर देखील मी संपूर्ण हॉटेल त्यांच्या हवाली केलं नसतं. सगळीकडं सांगितलं जातंय की मी फरार आहे. मी फरार नाही. मी इथंच आहे. मी मॅनेजरसोबत दररोज जेवायला बसतो. त्यामुळे सत्यता समोर येईल, असं हॉटेल 7777 चे मालक म्हणाले.
