तुला मस्ती आली आहे का?
तु नीट काम करत नाही, तुला मस्ती आली आहे का, असं म्हणत मॅनेजरला अर्धनग्न करत सर्वांसमोर लोखंडी पाइपने मारहाण करणारा 7777 हॉटेल मालक लखन हरिदास माने याच्यावर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे, असे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितलं.
advertisement
हॉटेल मालक लखन माने याला अटक
या प्रकरणात मारहाण झालेल्या निवास आप्पासाहेब नकाते यांनी फिर्याद दिली असून हॉटेल मालक लखन माने याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. मात्र, काही तासांपूर्वीच याच मॅनेजरने आपली चूक होती, असं मालकासोबतच्या शुट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
लखन माने याने व्हिडीओमध्ये काय म्हटलं होतं?
माझी क्रुर कोणताही भावना नव्हती. हा व्हिडीओ चार महिन्यापूर्वीचा आहे. मारहाणीनंतर देखील मी संपूर्ण हॉटेल त्यांच्या हवाली केलं नसतं. सगळीकडं सांगितलं जातंय की मी फरार आहे. मी फरार नाही. मी इथंच आहे. मी मॅनेजरसोबत दररोज जेवायला बसतो. त्यामुळे सत्यता समोर येईल, असं हॉटेल 7777 चे मालक व्हिडीओ शेअर करत म्हणाले होते. त्यावेळी तिथं मॅनेजर देखील होते.
खिशातले दोन हजार जबरदस्तीने घेतले
दरम्यान, ऑगस्ट 2025 मध्ये लखन हरिदास माने यांनी मॅनेजरच्या अंगावरील कपडे काढून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये जबरदस्तीने घेत अर्धनग्न करत हॉटेलबाहेर सर्व कामगारांसमोर शिवीगाळ केली. तसेच मालकाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोखंडी पाइपने जोराने मारहाण केली. शिवीगाळ करत 'तु तक्रार दिली, काम सोडलं तर जिवे मारणार, अशी धमकी दिली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.
