रविवारी 20 एप्रिल रोजी मिरवणुकीच्या दिवशी हैदराबाद, तुळजापूर-पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पत्रकार भवन चौक-महावीर चौक-गुरूनानक चौक-संत तुकाराम चौक-अशोक चौक-शांती चौक-जुना बोरामणी नाका चौकातून मार्केट यार्ड हा मार्ग वापरता येईल. तर मंगळवेढ्याकडून होटगी रोड व विजयपूर रोडकडे जाणाऱ्या वाहनांना मरिआई चौक-नागोबा मंदिर- रामवाडी पोलिस चौकी-मोदी बोगदा- पत्रकार भवनपासून पुढे जाता येईल.
Pune Weather: चैत्रातच पेटला वैशाख वणवा, पुण्यानं तापमानात विदर्भाला टाकलं मागं, आज पुन्हा अलर्ट
advertisement
जुना पुना नाका चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांसाठी जुना पुना नाका-जुना कांरबा नाका-जुना तुळजापूर नाका- बोरामणी नाका- शांती चौक-रंगभवन- सातरस्ता-मोदी पोलिस चौकी-मोदी बोगदा-रामवाडी दवाखाना-रामवाडी पोलिस चौकी-रेल्वे स्टेशन किंवा जुना पुना नाका-नवीन केगाव बायपासमार्गे देगाव नाक्याकडून मरिआई चौक-नागोबा मंदिर ते रेल्वे स्टेशन हा मार्ग उपलब्ध असणार आहे.
20 तारखेला बंद असणारे मार्ग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान-सम्राट चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक, हॉटेल ॲम्बेसिडर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक- मेकॅनिक चौक- सरस्वती चौक- चार पुतळा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- डफरीन चौक- जुना एम्प्लॉयमेंट चौक- वाडीया हॉस्पिटल-चांदणी चौक- महापौर निवास- रेल्वे स्टेशन गांधी पुतळा- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक- मेकॅनिकी चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.
तसेच यादिवशी विजयपूर, मंगळवेढ्याकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी नवीन केगाव बायपास रोड व अक्कलकोटकडून येणाऱ्या जड वाहनांसाठी नवीन अक्कलकोट नाका-शांती चौक-जुना बोरामणी नाका-मार्केट यार्डापासून पुढे, असा मार्ग उपलब्ध असणार आहे. 20 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 21 एप्रिलच्या पहाटे दोन वाजेपर्यंत हा बदल असणार आहे.






