पंप बंद राहणार
मुख्य पाइपलाइन दुरुस्तीच्या कामासाठी उजनी आणि पाकणी येथील पंप बंद राहणार आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून पाण्याचा उपसा होणार नाही. दुरुस्ती कामासाठी जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे भवानी पेठ पंपगृहावर अवलंबून असलेल्या परिसरात गुरुवारी, 26 जून रोजीचा पाणी पुरवठा उशीरा, कमी वेळ आणि कमी दाबाने होईल.
Ashadhi Wari 2025: पंढरीचा प्रसाद म्हणून चुरमुरे, बत्तासेच का? तुम्हाला माहितीये का हे कारण?
advertisement
5 दिवसआड पाणीपुरवठा
सध्या सोलापूर शहर परिसरात चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. आता एक रोटेशनसाठी एक दिवस उशिरा होणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना पाणी जपून वापरावं लागेल. गैरसोय टाळण्यासाठी शहरवासियांनी पाणी जपून वापरावे आणि महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 26, 2025 9:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: ऐन पावसाळ्यात जलसंकट, सोलापूरला आता 4 नव्हे 5 दिवसआड पाणी, कारण काय?