सोलापूर : रमजाननिमित्त सोलापुरातील बाजारपेठेत तब्बल 400 प्रकारचे अत्तर विक्रीसाठी आले आहेत. इतर राज्यातून, देशातून दरवर्षी अत्तर येत असतात. यंदा फ्रान्स, दुबई अशा विविध देशातील अत्तरांचा सुगंध सोलापुरात दरवळत आहे. 1 हजार रुपयांपासून ते 40 हजार रुपयेपर्यंत किंमतीचे अत्तर विजापूर वेस येथील अत्तर व्यापारी मोहसिन बागवान यांच्याकडे उपलब्ध आहेत. या संदर्भात अधिक माहिती अत्तर व्यापारी मोहसिन बागवान यांनी लोकल 18 शी बोलताना दिली आहे.
advertisement
नमाज पठण करताना काही पुरुष अत्तर लावून ही नमाज पठण करतात. मुस्लिम धर्मात अत्तर लावण्याची एक प्रथाच आहे. तसेच मुस्लिम धर्मात अत्तर लावतात. या महिन्यात आपल्या पाहुण्यांना गिफ्ट म्हणून अत्तरची बाटली ही देण्याची सुध्दा मुस्लिम धर्मात परंपरा आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात अनेक परंपरेला आणि संस्कृतींना विशेष असे अनन्या असाधार महत्त्व आहे.
नोकरी सोडली, डेअरी व्यवसायात नशीब आजमावले, वर्षाकाठी तरुणाची 50 लाखांची उलाढाल
मस्क, व्हाईट मस्क, जन्नत ए फिरदोस अशा विविध प्रकारातील अत्तरांना नेहमीच पसंती दिली जाते. लहान बालकांपासून स्त्रिया - पुरुष गटाच्या अशा विविध पसंतीचे अत्तर येथे उपलब्ध झाले आहेत. कुणाला सौम्य आणि दीर्घकाळ टिकणारे तर कुणाला सुगंधी अत्तर आवडते. सध्या सोलापुरात असणाऱ्या विजापूर वेस परिसरात अत्तर घेण्यासाठी मुस्लिम बांधव - भगिनींची गर्दी होत असल्याचे अत्तर विक्रेते मोहसिन बागवान यांनी सांगितले.
फक्त राज्यातून देशातून रमजानच्या महिन्यात अत्तर येत असतात उदल हश्मी, ऊद रेहमान, ऊद- उल अमीर, कंबोडी, अंबर उद, लेदर ऊद,अल्फजोहरा, मोगरा, असे 400 प्रकार अत्तराचे बाजारात उपलब्ध झाले आहेत. ह्या अत्तराच्या किंमती जवळपास 1 हजार पासून ते 40 हजारांपर्यंत आले आहेत.
सौंदर्य आणि सुगंधाच्या क्षेत्रात, स्त्रियांसाठी अत्तर एक आकर्षण आहे, मन, शांतता राहण्यासाठी सौम्य प्रकारचे अत्तर महिला वापरतात. मोगरा रोज, आईस बर्ग, डव्ह, लक्स, लबैक, गुच्ची फोल्रा, चमेली जास्मीन हे अत्तर महिलांसाठी स्पेशल आहेत महिलाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. मग तुम्हालाही अत्तर खरेदी करायचे असेल तर तुम्ही याठिकाणी नक्कीच भेट देऊ शकतात.