TRENDING:

Solpaur: नगरपंचायत निवडणुकीत भाजपने उधळला पहिला गुलाल, अजित पवार गटाला दिला धक्का

Last Updated:

अर्ज भरण्यासाठी एकच इच्छुक उमेदवारांनी एकच भाऊगर्दी केली होती. पण, दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात भाजपने गुलाल उधळला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रितम पंडित, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

सोलापूर : नगरपरिषदा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. आज शेवटचा दिवस असल्यामुळे अर्ज भरण्यासाठी एकच इच्छुक उमेदवारांनी एकच भाऊगर्दी केली होती. पण, दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात भाजपने गुलाल उधळला आहे.  मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतच्या सतरा जागा बिनविरोध झाल्या आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातून भाजपमध्ये आलेले राजन पाटील यांच्या पॅनलने १७ जागा बिनविरोध निवडून आल्या आहे. पण, नगराध्यक्षपदासाठी अर्ज आल्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट लढत होणार आहे.

advertisement

नगर पंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी चढाओढ सुरू होती. पण,   मोहोळ तालुक्यात  भाजपचे नेते राजन पाटील यांच्या पॅनलने अनगर नगरपंचायतीच्या १७ जागा बिनविरोध निवडून आणल्या आहेत. अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी 17 जागा बिनविरोध निवड झाल्या आहेत. त्यामुळे राजन पाटील समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे.

नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार

पण, उज्वला थिटे यांनी पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

advertisement

पण, भाजप नेते राजन पाटील यांचे अनगर नगराध्यक्षापदाची निवडणूक बिनविरोध होण्याचं स्वप्न भंगलं आहे. अलीकडे राजन पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये आल्यानंतर अनगर नगरपंचायत निवडणुकीत १७ उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहे.  पण, नगर परिषदेचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाविरोधात भाजपाशी नगराध्यक्षापदासाठी आता लढत होणार आहे.  राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उज्वला थिटे यांच्यात आता लढत होणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका एकरात केली काकडी लागवड, 60 दिवसांत 1 लाख कमाई,शेतकऱ्याने सांगितला फॉर्म्युला
सर्व पहा

राजन पाटील कुटुंबीयांचं  मागील अनेक वर्षांपासून मोहोळ तालुक्यासह ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व राहिलं आहे.  अनगर ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. राजन पाटील कुटुंबीयांचं या भागात वर्चस्व असल्यामुळे निवडणुकीत कुणीही समोर आलं नाही. त्यांच्यासमोर असा भक्कम चेहरा उभा राहिला नाही. अखेरीस ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्व नगरसेवक निवडून आले आहे. पण,  उज्वला थिटे थिटे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आता नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solpaur: नगरपंचायत निवडणुकीत भाजपने उधळला पहिला गुलाल, अजित पवार गटाला दिला धक्का
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल