TRENDING:

Kalyan: फक्त 3 सेकंद अन् सुसाट कारने सायकलस्वाराला फुटबॉलसारखं उडवलं, कल्याणमध्ये हिट अँड रन घटनेचा VIDEO

Last Updated:

अचानक पाठीमागून भरधाव वेगात एक कार आली. अवघ्या काही सेकंदात भरधााव कारने श्रीनिवास यांना जोराची धडक दिली. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण :  कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये हिट अँड रनची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गांधारी येथील रिंग रोडवर एका भरधाव कारने सायकल स्वाराला जोराची धडक दिली. या अपघाताच सायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. कार चालक फरार असून पोलीस शोध घेत आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  कल्याणमधील गांधारी येथील रिंग रोडवर २४ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. श्रीनिवास असं मृत सायकलस्वाराचं नाव आहे. रिंग रोडवर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे.  रात्री याच रिंग रोडवर श्रीनिवास हे आपल्या सायकलवरून घरी जात होते. अचानक पाठीमागून भरधाव वेगात एक कार आली. अवघ्या काही सेकंदात भरधााव कारने श्रीनिवास यांना जोराची धडक दिली.

advertisement

कारचा वेग इतका जास्त होती की, श्रीनिवास हे सायकलसह दूर फेकले गेले. सायकलला धडक दिल्यानंतर कारचालक दूरवर जाऊन थांबला. पण त्यानंतर मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून फरार झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी कल्याण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे  फरार कारचालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. धक्कादायक म्हणजे, रिंग रोडवर याआधीही अनेक अपघात झाले आहे. त्यामुळे रिंग रोड हा अपघातांचा हॉटस्पॉट बनत चालला आहे.

advertisement

ट्रकने महिलेला चिरडलं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, धाराशिवमधूनअशीच एक अपघाताची बातमी समोर आली आहे.  रस्त्याने चालत असलेल्या 56 वर्षीय महिलेला ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे असून कळंब शहरातील होळकर चौकात ही घटना घडली असून यात महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये कैद झाली असून 56 वर्षीय शेख शमीमा यांचा मृत्यू झाला आहे. 56 वर्ष शमीमा या आपल्या मुलीकडे कळंबला या भेटण्यासाठी आल्या होत्या. नातवाला सोबत घेऊन जात होत्या. याच दरम्यान त्यांच्या बाजूने जाणाऱ्या नव्या ओपन ट्रक जात होता. ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन चिरडल्या गेल्या त्यांचा मृत्यू झाला. पण सुदैवाने यात तो लहान मुलगा बचावला असून घटना घडतात नागरिकांनी एकच गर्दी केले असून या चौकात दुभाजक बसवण्याची मागणी करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan: फक्त 3 सेकंद अन् सुसाट कारने सायकलस्वाराला फुटबॉलसारखं उडवलं, कल्याणमध्ये हिट अँड रन घटनेचा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल