TRENDING:

Nashik: 1 कोटीत ठरलं, 20,00,000 रुपयांचा पहिला हफ्ता, राज्य कर उपायुक्तासह 3 जणांना लाच घेताना पकडलं!

Last Updated:

सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं लाच घेण्याचा प्रमाण काही केल्या कमी झालं नाहीये. अशातच नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक : राज्य सरकार आणि केंद्र सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना सगळ्या सवलती मिळवून देण्यासाठी कधी कमी पडत नाही. पण, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं लाच घेण्याचा प्रमाण काही केल्या कमी झालं नाहीये. अशातच नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल २० लाखांचा लाच स्वीकारण्याच्या प्रयत्नात असलेल्या राज्य कर उपायुक्त, सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.  महाराष्ट्र लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही धडक कारवाई केली.
News18
News18
advertisement

मिळालेल्याा माहितीनुसार, नाशिकमध्ये ही महाराष्ट्र लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली आहे.  वस्तू व सेवा कर कार्यालय नाशिक इथं राज्य कर उपायुक्त सोमनाथ दत्तू पागे ( वय 47) आणि  सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे (वय 55 वर्ष) या दोघांसह अमित हिरामण जाधव या व्यक्तीलाही अटक केली आहे. या दोघांनी एका व्यक्तीकडे तब्बल २० लाखांची लाच मागितली होती.

advertisement

१ कोटी ठरले, २० लाखांचा हफ्ता

सोमनाथ पागे आणि मच्छिंद्र दोंदे याने जीएसटी विभागाकडून कारवाई केली होती.  तक्रारदाराकडून 1 कोटी 25 लाख रुपयाची मागणी केली होती. पण तडजोड कर तक्रारदाराकडून १ कोटी रुपये घेण्यावर ठरलं होतं. याचा पहिला हफ्ता म्हणून  20 लाख रुपयांच लाचेच्या रक्कमेची मागणी केली होती. तक्रारदाराने याा प्रकरणी महाराष्ट्र लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

advertisement

घरात आढळले २ लाख

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्रांक्षाला 14000 रुपये दर, कांदा आणि केळीला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

ACB च्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचला आणि  दामोदर चौक  नाशिक येथील तक्रारदार यांचे कार्यालयात लाचेच्या रकमेतील पहिला हफ्ता  20 लाख घेण्यासाठी आलेल्या अमित हिरामण जाधवला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर आरोपी सोमनाथ पागे आणि मच्छिंद्र दोंदे यांच्या घराची झडती घेतली असता २ लाख रुपये आढळून आले. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ , १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik: 1 कोटीत ठरलं, 20,00,000 रुपयांचा पहिला हफ्ता, राज्य कर उपायुक्तासह 3 जणांना लाच घेताना पकडलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल