सरकारमध्ये सगळं काही आलबेल असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. सुधीर मुनगंटीवार हे आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आणि खाजगी कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
...तर एकनाथ शिंदे थेट अजितदादांना कॅबिनेटमध्येच बोलतील
एकनाथ शिंदे हे अमितभाईंकडून जाऊन अजितदादांची तक्रार करणार नाहीत. त्यांना जर दादांविषयी तक्रार असती तर थेट कॅबिनेटमध्ये अजितदादांकडे बोलतील, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. एकनाथ शिंदे हे चांगले नेते आहेत. त्यांच्या मनात कुठलीही तक्रार नसणार आहे. एकनाथ शिंदे यांना जर कुणाबद्दल बोलायचे असेल तर ते अमितभाईंच्या माध्यमातून बोलणार नाहीत. एकनाथभाई थेट अजितदादा यांना कॅबिनेटमध्ये विचारतील आणि बोलतील, असे मुनगंटीवार म्हणाले.
advertisement
सामनाच्या उल्लेखाविषयी मुनगंटीवार म्हणाले...
तसेच कॅबिनेटमध्ये खून होतील , असे उल्लेख जर सामनामध्ये येऊ लागले तर सामनाला लोक गमतीजमती म्हणून यापुढे पाहायला सुरुवात करतील. सामना कधीच चांगले बोलू शकणार नाहीत, असे मिश्किल वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला
नाशिकच्या प्रमोशनबाबतचे माझे वक्तव्य काही लोकांनी ट्विस्ट करायचे ठरवले होते. कारण , माझ्या व्याख्यानानंतर विरोधी नेत्यांचे व्याख्यान होते. त्यामुळे याठिकाणी आमचे सरकार आले पाहिजे, असे आपण म्हणाले होतो, असे स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिले.
पक्षाने मला डावलले नाही
पक्षाने मला डावलले नाही. नवीन लोकांना संधी द्यायची होती. त्याबाबत पक्षाने निर्णय घेतला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितले.
ज्यांना आपण भारतरत्न दिला, त्यांना वाईट बोलायला नको
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरून चालू असलेल्या वादावरही मुनगंटीवार बोलले. ज्यांना आपण भारतरत्न दिला, महाराष्ट्र भूषण दिला, त्यांच्याबद्दल चुकीचे बोलू नये. तुम्हाला शंका होती तर तुमचे सरकार असताना तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती, अशी खोचक टिप्पणी विजय वडेट्टीवारांवर मुनगंटीवार यांनी केली.