TRENDING:

कुस्ती, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, राज्यस्तरीय स्पर्धा कुठे कुठे होणार? सुनेत्रा पवारांकडून घोषणा

Last Updated:

State Level Sports Competitions: सन २०२५-२६ या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत आज बैठक पार पडली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे हे महत्त्वपूर्ण आहे. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना समान संधी मिळावी, त्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्यासाठी आवश्यक व्यासपीठ मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.
सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार
advertisement

हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथमध्ये, कबड्डी स्पर्धा नागपुरात, कुस्ती स्पर्धा बीडमध्ये

सन २०२५-२६ या वर्षात विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत आज बैठक पार पडली. यावेळी कोणकोणत्या शहरात क्रीडा स्पर्धा होणार याबाबतची घोषणा करण्यात आली. यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथे, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड येथे तसेच कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा बारामती येथे आयोजित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

advertisement

नवोदित खेळाडूंना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शाहरूख अन् सलमान खानला पाहायचं? फक्त 50 रुपयांत होईल 'भेट', वांद्र्यात फिरण्याचा
सर्व पहा

राज्यस्तरीय स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार असून क्रीडा क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. यामुळे महाराष्ट्राची समृद्ध क्रीडा परंपरा अधिक बळकट होऊन राज्याला भविष्यात अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, अशी खात्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुस्ती, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, राज्यस्तरीय स्पर्धा कुठे कुठे होणार? सुनेत्रा पवारांकडून घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल