TRENDING:

चाकणकर म्हणाल्या, स्वेच्छेने राजीनामा, पण सुनेत्रा पवारांनी तोंडावर पाडलं, थेट मुद्द्याला हात!

Last Updated:

राष्ट्रवादीच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र रुपाली चाकणकर यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला, राजीनामा देताना काय चर्चा झाली, हेच जनतेला सांगून त्यांना अप्रत्यक्षपणे तोंडावर पाडले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या अध्यात्मिक रुपाला भुलून रुपाली चाकणकर यांनी त्याला गुरू मानले. त्याची पाद्यपूजा करीत 'गुरूमाऊली' म्हणत भावी जीवनाचा मंत्र त्याच्याकडून घेतला. अगदी त्याला पांडुरंगाचे रूप मानून देवाप्रमाणे त्याला पुजले. मात्र त्याच्याबाबत काळे सत्य समोर येताच हात वर करून आपण 'मुरलेल्या राजकारणी' आहोत, हे त्यांनी सिद्ध केले. त्याच्या काळ्या धंद्यांपायी रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याग करावा लागला. सर्व महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर टीकेचे आसूड ओढले गेले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी केली. त्याउपर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही लगोलग राजीनामा द्या, असा स्पष्ट दट्ट्या दिल्यानंतर स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे चाकणकर यांनी हुशारीने सांगितले खरे. परंतु राष्ट्रवादीच्या अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मात्र रुपाली चाकणकर यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला, राजीनामा देताना काय चर्चा झाली, हेच जनतेला सांगून त्यांना अप्रत्यक्षपणे तोंडावर पाडले.
रुपाली चाकणकर-सुनेत्रा पवार
रुपाली चाकणकर-सुनेत्रा पवार
advertisement

भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध झाल्याने महायुती सरकारची नाचक्की झाली होती. भोंदूबाबाच्या आहारी गेलेला महिला आयोग असे म्हणत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडले होते. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चाकणकरांना वर्षा निवासस्थानी पाचारण करून राजीनामा देण्याचे आदेश दिले. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून चाकणकर यांनी स्वच्छेने राजीनामा देत असल्याचे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिले. त्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांनी टोकदार शब्दात टीका केली. राजीनाम्याचे खरे कारण का सांगितले नाही, असा जाब विचारला. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांवर चाकणकर यांच्या राजीनाम्याचे कारण राज्याला अवगत केले.

advertisement

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली नीलेश चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत सुनेत्रा पवार यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याचा चाकणकर यांचा मुद्दा एकप्रकारे खोडून काढल्याचे बोलले जाते. तसेच स्वेच्छेने राजीनामा झाला नसल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत सुनेत्रा पवार यांनी चाकणकर यांना तोंडावर पाडल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

advertisement

अशोक खरात यांच्या अनुषंगाने सुरू असलेली चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवत असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

रुपाली चाकणकर यांनी राजीनामा पत्रात काय म्हटले आहे?

मी रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, दि. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Summer Recipe: उन्हाळ्यात काहीतरी चवदार खायचंय? झटपट बनणाऱ्या या कांदा चटणीपुढे पनीरही फिकं, VIDEO
सर्व पहा

आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतशः ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे. धन्यवाद...!

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चाकणकर म्हणाल्या, स्वेच्छेने राजीनामा, पण सुनेत्रा पवारांनी तोंडावर पाडलं, थेट मुद्द्याला हात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल