TRENDING:

सूत्रं हाती घेताच सुनेत्रा पवार बड्या कॅबिनेट मंत्र्यावर नाराज, नेमकं कारण काय?

Last Updated:

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत. सूत्रं हाती घेताच त्या एका कॅबिनेट मंत्र्यावर नाराज झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रणाली कापसे, प्रतिनिधी मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत. आता त्या अजितदादांच्या निधनाच्या दु:खातून सावरत कामाला लागल्या आहेत. त्यांनी मंत्रालयात बैठका आणि विविध ठिकाणचे दौरे सुरू केले आहेत. अगदी अजित पवारांच्या कार्यपद्धतीप्रमाणेच सुनेत्रा पवारही काम करायला लागल्या आहेत. दरम्यान, त्यांनी एका कॅबिनेट मंत्र्यावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आपली प्रतिमा जपण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
News18
News18
advertisement

सुनेत्रा पवार कोणत्या मंत्र्यावर नाराज?

सुनेत्रा पवार ज्या कॅबिनेट मंत्र्यावर नाराज आहेत, त्या मंत्र्याचं नाव नरहरी झिरवाळ आहे. झिरवाळ यांनी सोमवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी सुनेत्रा पवार झिरवाळ यांच्यावर नाराज झाल्या. मंत्रालयाच्या कार्यालयातील कर्मचारी लाच प्रकरणावरून ही नाराजी व्यक्त केली आहे. स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्यावी. प्रशासनातील अधिकाऱ्यामुळे बदनामी होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झिरवाळ यांना दिल्या आहेत.

advertisement

सोमवारी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यानी भेट घेतली. तेव्हा सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांनी अलीकडेच अजित पवारांच्या अपघातानंतर अल्पसंख्यांक विभागाकडून ७० संस्थांना परवाने दिल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर त्यांनी झिरवाळ यांच्यावर देखील नाराजी व्यक्त केली आहे. यातून कुठेतरी त्यांच्या कामात अजित पवारांच्या कामाची झलक दिसत असल्याची चर्चा आहे.

advertisement

मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण काय आहे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात लाचखोरीचं एक प्रकरण उघडकीस आलं होतं. एक अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात हा प्रकार घडला होता. झिरवळ यांच्या कार्यालयातील राजेंद्र ढेरंग या कर्मचाऱ्याने एका मेडिकल दुकानदाराकडून 35 हजारांची लाच घेतली होती. हे पैसे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी (एसीबी) राजेंद्र ढेरंग यांना रंगेहाथ पकडले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री असलेल्या नरहरी झिरवळ यांची नाचक्की झाली होती. या घटनेनंतर नरहरी झिरवळ यांनी संबंधित प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच या प्रकरणाशी माझा संबंध आढळून आल्यास मी राजीनामा देईन, असा खुलासा त्यांनी दिला होता. मात्र, या प्रकरणात नरहरी झिरवळ यांच्या खासगी पीएनेच राजेंद्र ढेरंग यांना पैसे घेण्यास सांगितल्याची माहिती चौकशीत पुढे आली आहे. या सगळ्या प्रकरणावरून सुनेत्रा पवार यांनी झिरवळांवर नाराजी व्यक्त केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सूत्रं हाती घेताच सुनेत्रा पवार बड्या कॅबिनेट मंत्र्यावर नाराज, नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल