TRENDING:

Maharashtra Politics: सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं एकत्र येणं अपरिहार्य? ही आहेत प्रमुख कारणं

Last Updated:

अजित पवार केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावू इच्छित असतील, तर सुप्रिया सुळे यांच्या गटाशी एकत्र येणं ही राजकीय अपरिहार्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकू लागले आहेत. शरद पवार यांनी केलेले वक्तव्य या निर्णयाची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर आहे यामुळे चर्चांना अधिकृत स्वरूप आले आहे. पण यामागे केवळ कौटुंबिक समेट नाही, तर एक मोठं राजकीय गणित लपलेलं आहे. विशेषतः केंद्र सरकारात अजित पवार गटाला आपली ताकद वाढवायची असल्यास सुप्रिया सुळे यांच्यासोबत जाण्यावाचून पर्याय उरत नाही, हे स्पष्ट होत आहे.
Supriya Sule- Ajit Pawar
Supriya Sule- Ajit Pawar
advertisement

सुप्रिया सुळे यांच्याकडे खासदारांची संख्या जास्त हीच अजित पवारांसाठी जमेची बाजू आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे यांच्या गटाकडे जास्त खासदार आहेत. अजित पवार गटाकडे मुख्यतः राज्यातील आमदार आहेत, पण केंद्रात ताकद निर्माण करण्यासाठी खासदारांची संख्या निर्णायक ठरते. त्यामुळे अजित पवार केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावू इच्छित असतील, तर सुप्रिया सुळे यांच्या गटाशी एकत्र येणं ही राजकीय अपरिहार्यता आहे.

advertisement

एकत्र येण्यामागील प्रमुख कारणं 

1. केंद्रात ताकद वाढवण्याचा प्रयत्न: भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी असतानाही अजित पवार यांना केंद्रात स्वतंत्र वजन निर्माण करता आलेलं नाही. त्यांना मंत्रिपद किंवा धोरणनिर्मितीत प्रभावी सहभाग न मिळाल्याने अस्वस्थता वाढली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे असलेले खासदार, त्यांच्या सौम्य प्रतिमेसोबतच संसदीय अनुभव, हे अजित पवारांना केंद्रात हवी असलेली ‘लॉबिंग पॉवर’ देऊ शकतात.

advertisement

2. शरद पवार यांची रणनीती : शरद पवार हे अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय राजकारणात एक विचारप्रवर्तक नेता म्हणून पाहिले जातात. त्यांचं सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व देणं, ही केवळ कौटुंबिक भावनिक बाब नाही, तर एका नवे नेतृत्व केंद्र उभं करण्याची योजना आहे. जिथे अजित पवार यांना ‘संघटनात्मक ताकद’ आणि सुप्रिया सुळे यांना ‘संसदीय वजन’ मिळून पूर्णपणे पूरक समीकरण तयार होऊ शकतं.

advertisement

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं एकत्र येणं केवळ कौटुंबिक समेटाचं प्रतीक नाही, तर राष्ट्रीय राजकारणात ‘पवार ब्रँड’ पुन्हा प्रभावी करण्याचा प्रयत्न आहे. खासदारांची संख्या, केंद्रात वाढवायचं वजन, आणि पवार कुटुंबाच्या पुढच्या पिढीचं नेतृत्व या सर्वांवर याचा परिणाम होणार आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics: सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं एकत्र येणं अपरिहार्य? ही आहेत प्रमुख कारणं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल