TRENDING:

मनातलं ओठांवर आलं? अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, वर्धापन दिनीच होणार भूकंप?

Last Updated:

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधीच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे त्या अजित पवारांसोबत जाण्यास तयार आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: आज राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापनदिन आहे. अजित पवार आणि शरद पवार गटाकडून आज पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वर्धापन दिनाचा सोहळा साजरा केला जातोय. त्यामुळे या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कोण काय बोलणार? याकडे आज सकाळपासूनचं सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधीच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यामुळे त्या अजित पवारांसोबत जाण्यास तयार आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.
News18
News18
advertisement

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी अजित पवार गटासोबत जाण्याबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. आमच्या गटातल्या काही लोकांना सत्तेत जावं वाटतं, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी देखील याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी देखील वर्धापन दिनापर्यंत थांबा, पांडुरंगाच्या मनात जे असेल तेच होईल, असं वक्तव्य केलं होतं. आता ऐन वर्धापन दिनाच्या दिवशीच सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसोबत जाण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

advertisement

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

खरं तर, आज सकाळी सुप्रिया सुळे यांनी 'सहन करायला शिका', अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं. यावर स्पष्टीकरण विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला माझ्या आईने सल्ला दिला, तो मी माझ्या व्हॉट्सअॅप स्टेट्सला ठेवला, ते माझं वैयक्तिक मत आहे. शरद पवारांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर त्याही अजित पवारांसोबत जाण्यास राजी आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय.

advertisement

अमोल मिटकरी काय म्हणाले होते?

अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला असता अमोल मिटकरी म्हणाले होते की, "पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढी एकादशीपर्यंत ताई दादा एकत्र येतील. अजून तसा काही प्रस्ताव आल्याचं कळलं नाही. पण दहा तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय. त्यामुळे दहा तारखेपर्यंत आपण वाट पाहावी. दोघांनी एकत्र येण्यासाठी कुणाचा विरोध असण्याचं काहीही कारण नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. पवारसाहेब, दादा आम्हाला जो काही आदेश देतील, तो आदेश अंतिम मानून आम्ही पुढे जाऊ. पांडुरंगाच्या मनात जे असेल तेच होईल. आषाढी एकादशीचा कशाला, कुठलाही मुहूर्त असू शकतो, पण तूर्तास तसा प्रस्ताव नाही."

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनातलं ओठांवर आलं? अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, वर्धापन दिनीच होणार भूकंप?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल