खरं तर, यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगर परिषद निवडणुकीसाठी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना (अजित पवार गट, शरद पवार गट) एकत्र आणण्याचं निश्चित केलं आहे. यानंतर असाच प्रयोग बीड, बार्शी आणि जळगावमध्ये करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा आहे. त्यासाठी दोन्ही बाजुने चाचपणी सुरू आहे.
'सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना प्रस्ताव'
advertisement
त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगर पालिका निवडणुकासाठीही दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाची युती होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. तसा प्रस्ताव खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, अजित पवारांनीच सांगितलंय की, युतीसाठी सुप्रिया सुळेंचा निरोप आला आहे. पण त्यांचे शरद पवारांशी अंतिम बोलणं झालेलं नाही.
अजित पवार युतीबाबत काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत अजित पवार म्हणाले की, मला पुण्यात स्थानिक आमदार, दोन्ही शहराध्यक्ष, माजी नगरसेवक भेटले. त्यांनी युतीबाबत भावना मांडली. पण चाचपणी करा आणि ठरवा, अशा सूचना मी दिल्या. दोन दिवसांनी मी पुन्हा पुण्यात येईन, तेव्हा आपण पुढील निर्णय घेऊ, असं मी त्यांना सांगितलं. कार्यकर्ते आपल्या भावना मांडत असतात. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याबाबत आपलं शरद पवारांशी बोलणं झालं नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.
