पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. सरकारी पातळीवरून वेगाने आदेश निघत असल्याने सुप्रिया सुळे यांना वेगळीच शंका आहे. पार्थ पवार किंवा अजित पवार यांनी स्पष्टीकरण देण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच खरे तर स्पष्टीकरण देऊन राज्यासमोर तथ्य मांडायला हवी, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
advertisement
सकाळीच पार्थसोबत बोललो, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास
माझा पार्थ पवार याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आज सकाळीच मी त्याच्यासोबत फोनवर बोलले. तो काहीही चुकीचे करणार नाही. ज्या बातम्या येत आहेत ते बघून दिशाभूल होत आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली.
जित पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
मी सहीच केली नाही तसेच व्यवहाराचा दस्तही पाहिला नाही, असे तहसीलदार सांगत आहेत. मग त्यांच्या निलंबनाचे कारण काय हे सरकारने स्पष्ट करावे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकार नक्की कोण चालवत आहे, निर्णय प्रक्रियेत कोण आहे? मुद्रांक शुल्क भरला आहे की नाही? याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी द्यावी, अशी मागणी करून अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तहसीलदार येवले यांचे निलंबन मागे घ्यावे
पार्थ पवार यांचा जमीन व्यवहार घोटाळ्यात काहीच संबंध नाही. हा सरकारचा विषय आहे. अजित पवार यांचा संबंध आहे की नाही हे मला सांगता येणार नाही. तहसीलदार येवले यांनी यांनी सहीच केली नाही तरी तुम्ही त्यांना कामावरून का काढले? आधी तहसीलदार येवले यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
