आता भाजप-ठाकरे युतीचा दुसरा अंक समोर आला आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातला एक संवाद समोर आला आहे. ज्यात हे तिन्ही नेते भाजप- ठाकरे युतीबाबत चर्चा करताना दिसत आहेत. या संवाद समोर आल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात भाजप-ठाकरे गट युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. लवकरच हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असं बोललं जातंय.
advertisement
नेमकं काय घडलं?
खरं तर, भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या मुलीचं मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये लग्न पार पडलं. या लग्न सोहळ्याला राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या लग्नाला उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि विनायक राऊत अशा ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. लग्नसमारंभात असे भाजप-ठाकरे गटाचे नेते एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या वेळी उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात काहीवेळ संवाद देखील रंगला.
लग्न समारंभात गप्पा मारताना मिलिंद नार्वेकर यांनी हसता हसता 'युती कधी होणार?' असा सवाल चंद्रकांत पाटील यांना विचारला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनीही मिश्किल उत्तर दिलं. मीही त्याच सुवर्ण क्षणाची वाट पाहत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यानंतर दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. दोघं हसू लागले. दोघांना हसताना पाहून उद्धव ठाकरे यांनी 'अरे काय कुजबूज करताय' असं विचारलं. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, 'मीच हेच म्हणत होतो की, युती होईल तो माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल!' उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातला हा संवाद समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. लवकरच हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असं बोललं जातंय.