भोंदूबाबा अशोक खरात याचे नवनवीन कारणामे उजेडात येत असताना नांदेड जिल्ह्यातील बिबोली तालुक्यातील बडूर या गाव परिसरात एक भोंदू बाबा ज्ञानेश्वर करडे ऊर्फ तलवार बाबा याचे कारनामे उघड झाले आहेत. बरूड गावाजवळच्या माळ रानावर तलवार बाबा याने बिरोबाच मंदिर स्थापन केलं. याच ठिकाणी तो दर रविवारी दरबार भरवत होता. स्वतःच्या हातात तलवार घेऊन "माझ्या अंगात दैवी शक्ती आहे" म्हणत भाविकांच्या अंगावर लिंबू कापून पिळत असे आणि संतती, घर शांती, नोकरीचे विषय सुटतील असं आश्वासनं भाविकांना देत होता.
advertisement
लोकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी टाकला छापा
त्याच्या या कारनाम्याचा पर्दाफाश अंनिस संघटनेनं केला. मागील काही दिवसांपासून तलवार बाबा हा बिलोली परिसरात असल्याची तक्रार प्राप्त झाली. लोकांवर तलवारीने लिंबू कापून टाकायचा. वेगवेगळी आश्वासनं द्यायचा. त्यामुळे पोलिसांनी बिलोली परिसरात जाऊन छापा टाकला. ज्ञानेश्वर करडेला ताब्यात घेतलं आहे. त्या ठिकाणी अंधश्रद्धा पसरवणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जेव्हा ज्ञानेश्वर करडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत होता. त्यावेळी त्याच्या भाविकांनी गुन्हा दाखल करू नये म्हणून अडथळा आणला होता. या प्रकरणीही संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे, त्यानंतर बिलोली पोलिसांनी अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध उच्चाटन कायदा सन 2013 प्रमाणे बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.
"मी भोंदूबाबा नाही, महिलांना तलवार वाटणार'
माझ्या अंगात दैवी शक्ती आहे. लिंबू कापणे हा सगळ्याच मंदिरात प्रकार करत असतो. हे एक फळ आहे. यामध्ये वाईट काही नाही. आजार बरे होते का, मी कुणालाही बोललो नाही. मी कोणतीही भोंदूगिरी करत नाही, फसवणूक करत नाही. अंधश्रद्धा पसरवत नाही. मी ज्या ठिकाणी पूजा करतो, कोणतीही बंदिस्त जागा नाही. मी तलवार बाबा नाही. मी आजपर्यंत चांगल्या गोष्टी केल्या. मी एक लाख माता भगिनींना कायद्याच्या चौकटीत बसून १ लाख तलवार वाटप करणार, हा माझा संकल्प आहे, असा अजब दावाच या तलवार बाबाने केला.
