प्रवीण दरेकरांची मोठी घोषणा...
भाजप आणि मुंबै जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी आज ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर निवड करण्यात आली आहे. तेजस्वी यांची निवड ही त्यांचे दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांच्या जागी करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, अभिषेक घोसाळकर संचालक होते, त्यांच्या हत्येनंतर रिक्त जागेवर नेमणूक करण्याचा अधिकार संचालक मंडळाला असतो. सद्भावना म्हणून संचालक मंडळाने एकमताने तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून नेमलं असून ही रिक्त जागा भरणे कायदेशीररित्या क्रमप्राप्त असल्याचे दरेकरांनी स्पष्ट केले.
advertisement
मुंबै बँक ही मुंबईतील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची बँक आहे. या बँकेच्या संचालक मंडळावर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट अशा विविध पक्षांशी संबंधित नेते संचालक मंडळावर आहेत. प्रवीण दरेकर हे मागील काही वर्षांपासून या बँकेच्या अध्यक्षपदी आहेत. तर, ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर हे देखील संचालक मंडळावर होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी तेजस्वी घोसाळकर यांची नियु्क्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीच्या टायमिंगची चर्चा...
तेजस्वी घोसाळकर यांच्या नियुक्तीच्या टायमिंगची चर्चा सध्या रंगली आहे. तेजस्वी घोसाळकर या नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर तेजस्वी यांची नियुक्ती संचालक मंडळावर करण्यात आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या जागी ही नियुक्ती होण्यास उशीर झाला. त्यानंतर आता ऐन महापालिका निवडणुकीच्या आधी तेजस्वी घोसाळकर यांची ही नियुक्ती करण्यात आल्याने आता टायमिंगवर चर्चा रंगली आहे.